आज साजरा करा हेल्दी व्हॅलेंटाईन डे
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2016 04:52 IST2016-02-13T11:52:09+5:302016-02-13T04:52:31+5:30
जोडीदाराच्या आरोग्यासाठी जर तुम्ही काही करू शकले तर तो बेस्ट व्हॅलेंटाईन डे होईल.

आज साजरा करा हेल्दी व्हॅलेंटाईन डे
1. हेल्दी नाश्ता
सकाळी बे्रकफास्टमध्ये फास्टफुड किंवा तळलेले पदार्थ खाण्यापेक्षा जोडीदाराला स्ट्रॉबेरी म्युस्ली आणि मलाईरहित दुधाचा आरोग्याला अतिलाभदायक नाश्ता देऊन सरप्राईज करा किंवा ओट्स, गव्हाचे पोहे, स्ट्रॉबेरी, मक्याचे पोहे असा कमी कॅलरी आणि चवीला रुचकर नाश्त्याने दिवसाची सुरुवात करु शकता.
2. ग्रीन टी आणि जॅस्मिन
अनेक जण १४ फेब्रुवारीला यादगार करण्यासाठी विविध कॉकटेलचे नियोजन करत असतील. परंतु तुमच्या प्रेमाला हेल्दी टच देण्यासाठी ग्रीन टी आणि जॅस्मिन सर्वोत्तम मार्ग आहे. दुपारच्या वेळी जोडीदाराचा हात हातात घेऊन मस्त आरामशीर ग्रीन टीचे घोट घेत रोमॅण्टिक गप्पा मारण्यापेक्षा अधिक चांगले काय असू शकते?
3. आॅलिव्ह आॅईल डिनर
प्रेम म्हणजे एकमेकांच्या हृदयाशी केलेला संवाद असतो. त्यामुळे हृदयाची काळजी तर घेतलीच पाहिजे. जोडीदाराचे मन जिंकण्यासाठी व्हेलेंटाईन डे रोजी डिनर लाईट आॅलिव्ह आॅईलमध्ये तयार करा. रोजच्या तेलापेक्षा वेगळा स्वाद आणि आॅलिव्ह आॅईलमध्ये असणारे मोनोसॅच्युरेटेड फॅटी अॅसिड असा दुहेरी लाभ शक्य आहे.
4. मधाचा गोडवा
व्हॅलेंटाईन डे चॉकलेटशिवाय पूर्ण होऊच शकत नाही. मात्र, चॉक लेट किंवा इतर गोड पदार्थांमध्ये वापरण्यात येणारी साखर आपल्या आरोग्यासाठी फार अपायकारक आहे. त्यामुळे गोड खाद्यपदार्थांमध्ये प्रोसेस्ड शुगर किंवा चॉकलेट ऐवजी मध वापरावा. प्रेमाचा गोडवा तर टिकूनच राहिल, त्यासोबतच आरोग्यही सुधारेल.