​ आकर्षक फिगरसाठी...!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2016 19:56 IST2016-10-22T19:56:01+5:302016-10-22T19:56:01+5:30

आपल्या मनासारख्या फिगरसाठी आपण बरेच काही करतो.

For the catchy figure ...! | ​ आकर्षक फिगरसाठी...!

​ आकर्षक फिगरसाठी...!

आपल्या मनासारख्या फिगरसाठी आपण बरेच काही करतो. बऱ्याचदा या प्रयत्नात आपल्याकडून मोठी चूक होते. मनासारखी फिगर मिळविणे फारसे कठीण नाही, त्यासाठी खालील  टिप्स फॉलो करा..


सकस आहाराचे महत्त्व समजा-
सकस आहार म्हणजे कमी खाणे किंवा फक्त पौष्टिक खाद्य खाणे नव्हे. ज्या आहारात प्रथिने आणि जीवनसत्वांचा समावेश असेल असा असा आहार म्हणजे सकस आहार.

जेवणात रंग पहा-
कॅलरीज शिवाय आपण जेवणात व्हरायटीज, फ्रेश आणि प्रथिनांकडे लक्ष द्याल तर उत्तमच. जेवणात जेवढे जास्त रंग असतील, तेवढेच ते आरोग्यदायी आणि पोषक असेल. उदा. हिरवा भाजीपाला, ताजी फळे, दही आदी. 

सवय बदला-
आरोग्यास अपायकारक खाद्य पदार्थांना उपायकारक पदार्थांमध्ये बदला. फक्त चव पाहू नका तर त्यातील प्रथिनांची गरज आणि आरोग्यविषयक काळजीवाहू  बना. 

पाणी प्या-
पाणी आपल्या शरीरातील अपायकारक पदार्थांना बाहेर काढते. शिवाय शरीराच्या शुद्धीकरणाबरोबरच आपणास उत्साहवर्धक बनविते. 

Web Title: For the catchy figure ...!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.