शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचार समितीचा राजीनामा मागे घेतोय; काँग्रेस नेते नसीम खान यांची मोठी घोषणा
2
मराठी उमेदवाराचा प्रचार करण्यास गुजराती सोसायटीत विरोध; ठाकरे गटाचा दावा, काय घडलं?
3
उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी कन्हैया कुमारांनी केले हवन, सर्व धर्माच्या गुरूंचे घेतले आशीर्वाद! 
4
Narendra Modi : "भाजपा जे बोलते, ते करून दाखवते"; ओडिशामध्ये पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
5
T20 World Cup वर दहशतवादी हल्ल्याचे सावट; उत्तर पाकिस्तानमधून आली धमकी
6
रथावर स्वार मुख्यमंत्र्यांनी गदा उंचावली, काँग्रेसमधून भाजपात आलेल्या आमदाराच्या डोक्याला लागली, मग...  
7
संत मंडळींमध्ये ‘वडील’, उत्तर भारतात मोठी ख्याती; ‘अशी’ आहे संत गोरोबा काकांची महती
8
राहुल गांधींच्या वक्तव्यामुळे २०० विद्यापीठांचे कुलगुरू संतप्त, कारवाईची मागणी
9
उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकाला मारली थप्पड, भाजपाने शेअर केला व्हिडीओ 
10
Nexon EV Review: टाटा नेक्सॉन ईव्हीच्या रेंजने चकीत केले...; दररोजचे गाव ते पुण्यातील ऑफिसचे अंतर, कशी वाटली...
11
Adani Group Stocks SEBI: अदानी समूहाचे शेअर्स आपटले, SEBI च्या नोटिसनंतर स्टॉक्समध्ये घसरण कायम
12
स्टेशन मास्तरला लागली डुलकी, मिळाला नाही सिग्नल, स्टेशनवर खोळंबली ट्रेन, ड्रायव्हर हॉर्न वाजवून दमला, अखेर...
13
शरद पवारांंची तब्येत बिघडल्याने हेमंत ढोमेचं भावूक आवाहन, म्हणाला - "आपली मेहनत घेण्याची क्षमता..."
14
१५ हजार सॅलरी, १० हजारांची लाच अन् घरी सापडले ३० कोटी; वाचा इनसाईड स्टोरी
15
Video: कुटुंबासह अयोध्येत पोहोचला प्रसाद ओक; रामलला चरणी झाला नतमस्तक
16
स्वामी समर्थ पुण्यतिथी: स्वामीपूजनानंतर आवर्जून म्हणा, श्री स्वामी समर्थ महाराजांची आरती
17
सडलेला तांदूळ, खराब नारळ, लाकडाचा भूसा, केमिकलने बनवायचे मसाले, 'असा' झाला पर्दाफाश
18
स्वामी समर्थ पुण्यतिथी: शेकडो वर्षे लोटली, स्वामी आजही समस्त भक्तांच्या पाठीशी आहेत!
19
मी राजकारणातील सासू, तर अर्जुनराव हे माझी सून; रावसाहेब दानवे यांची टोलेबाजी
20
SBI मधून २० वर्षांसाठी ₹३० लाखांचं घ्याल Home Loan? किती असेल EMI, किती द्याल व्याज, पाहा

रोज शेव्हिंग केल्याने त्वचेचं नुकसान होतं का?; जाणून घ्या सत्य

By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2019 12:39 PM

अलिकडे जरी बिअर्ड लूकची फॅशन वाढली असली तरी अनेकांना अजूनही क्लिन शेव लूक ठेवणे पसंत आहे. पण यासाठी त्यांना सतत शेविंग करत रहावं लागतं. पण योग्यप्रकारे शेविंग न केल्याने अनेक गंभीर परिणामांना सामोरं जावं लागतं.

अलिकडे जरी बिअर्ड लूकची फॅशन वाढली असली तरी अनेकांना अजूनही क्लिन शेव लूक ठेवणे पसंत आहे. पण यासाठी त्यांना सतत शेविंग करत रहावं लागतं. पण योग्यप्रकारे शेविंग न केल्याने अनेक गंभीर परिणामांना सामोरं जावं लागतं. तसेच सतत चुकीच्या पद्धतीने शेविंग केल्याने काही काळाने त्वचा काळी आणि सैल होऊ लागते. अनेकदा शेविंग केल्यावर त्वचसंबंधी रोग जसे की, पिंपल्स, रॅशेज किंवा बॅक्टेरिअल इन्फेक्शन होतात.

साधारणतः सर्वच पुरूष दररोज किंवा एक दिवसाआड शेविंग करतात. असं ते स्वतःला क्लिन लूक देण्यासाठी करत असतात. बरेच पुरूष ऑफिसमध्ये बिअर्ड लूकऐवजी क्लिन शेव्ह लूकलाच पसंती देतात. शेविंग तुम्हाला क्लिन लूक देण्यासाठी मदत करते, हे अगदी खरं आहे. पण दररोज केलेल्या शेविंगमुळे तुमच्या त्वचेला फार नुकसान पोहोचू शकतं. 

शेविंगमुळे त्वचेला होणारं नुकसान : 

- शेविंग केल्याने त्वचेवरील केसांसोबतच तेलकटपणाही निघून जातो. त्यामुळे अनेकदा त्वचा कोरडी होते, त्यामुळे त्वचेवर रॅशेज, खाज यांसारख्या समस्यांचा सामना करावा लागतो. - त्वचेवर दररोज ब्लेड चालवल्याने इरिटेशन किंवा जळजळ यांसारख्या समस्या होऊ शकतात. 

- दररोज शेविंग केल्यानेरेज बंपची समस्या वाढते. यामुळे चेहऱ्याची त्वचा खरखरीत होते आणि त्याचबरोबर अनेकदा ब्लड येण्याची समस्याही वाढते. 

- सतत शेविंग केल्याने त्वचेचा ग्लो कमी होतो. असं अनेकदा शेविंग करताना त्वचासुद्धा निघून जाते आणि दररोज शेव्ह केल्यामुळे तिला रिकव्हर होणाची अजिबात संधी मिळत नाही. - दररोज शेव्हिंग केल्यामुळे इनग्रोन हेअरची समस्या होऊ शकते. यामुळे केस त्वचेतून बाहेर येण्याऐवजी आतमध्येच वाढू लागतात. यामुळे पसची समस्या होऊ लागते. 

- दररोज शेव्ह केल्यामुळे स्किन सेन्सेटिव्ह होते. ज्यामुळे त्वचेच्या समस्यांमध्ये वाढ होते. - शेविंग केल्यामुळे ओपन स्किन पोर्सची समस्याही वाढते. दररोज शेव्ह केल्यामुळे ओपन झालेल्या स्किन पोर्सना बंद होण्याची संधी मिळत नाही. यामुळे धूळ, प्रदूषण पोर्समध्ये जाऊन पिंपल्सची समस्या उद्भवते. 

टिप : वरील सर्व उपाय घरगुती आहेत आणि केवळ माहिती म्हणून आम्ही हे वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. प्रत्येकाची त्वचा वेगळी असते त्यामुळे सर्वच उपाय सर्वांच्याच त्वचेसाठी फायदेशीर असतील असं नाही किंवा असा दावाही आम्ही करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरेल.

टॅग्स :Skin Care Tipsत्वचेची काळजीBeauty Tipsब्यूटी टिप्स