ना थ्रेडिंग ना रेजर, वॅक्सिंगचा हा उपाय सर्वात बेस्ट, जुने सगळे उपाय विसराल...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2020 12:56 PM2020-01-29T12:56:59+5:302020-01-29T13:01:11+5:30

चेहरा आणि शरीरावरचे केस कधीकधी आपल्याला त्रासदायक वाटतात.

Best solution for waxing Know benefits of kattori wax | ना थ्रेडिंग ना रेजर, वॅक्सिंगचा हा उपाय सर्वात बेस्ट, जुने सगळे उपाय विसराल...

ना थ्रेडिंग ना रेजर, वॅक्सिंगचा हा उपाय सर्वात बेस्ट, जुने सगळे उपाय विसराल...

Next

चेहरा आणि शरीरावरचे केस कधीकधी आपल्याला त्रासदायक वाटतात. कारण त्यामुळे तुमचा चेहरा आणि त्वचेचा  लूक बदलण्याची शक्यता असते. अनेक मुली  नको असलेले केस काढण्यासाठी थ्रेडिंगचा वापर करतात. पण त्यासोबतच जर तुम्ही वॅक्सच्या वापराने नको असलेले केस काढाल तर फरक दिसून येईल. कारण थ्रेडिंगच्या तुलनेत  वॅक्सिंग करण्याचे अनेक फायदे आहेत.

देता है फ्लॉलेस लुक

या वॅक्सिंगच्या प्रकाराला कटोरी वॅक्स असं सुद्दा म्हणतात. कारण एका मेटलच्या वाटीत वॅक्स असतं. त्याचा वापर चेहरा आणि त्वचेवरचे नको असलेले केस काढण्यासाठी केला जातो. हा प्रयोग करण्यासाठी सगळ्यात आधी वाटी गरम करा. त्यानंतर वॅक्स घाला. वॅक्स वितळल्यानंतर काहीवेळ थंड होऊ द्या. त्यानंतर त्वचेच्या ज्या भागांवर जास्त केस आहेत त्या भागांवर  लावा मग थंड करा. ज्या दिशेने तुमचे केस उगवत असतील त्याच्या विरूध्द बाजूने वॅक्सची स्ट्रिप खेचा. जर तुमच्या शरीरावर जास्त केस असतील तर तुमच्यासाठी ही पध्दत उपयोगी ठरेल. 

आसानी से कर सकती है कटोरी वैक्‍स

चांगल्या लूकसाठी

फ्लॉलेस लुक थ्रेडिंगमुळे येत नाही. त्यामुळे तुमची  त्वचा खराब सुद्धा होऊ शकते. पण जर तुम्ही केस काढण्यासाठी वॅक्सचा वापर कराल तर त्वचा गोरी आणि मुलायम दिेसेल. केसांच्या वाढीच्या विरूध्द दिशेने केस काढण्यासाठी वॅक्सचा वापर करावा. अन्यथा केस उलटसूलट दिशेने येतात. अनेकदा वेळेअभावी मुली घाईघाईत रेजर फिरवतात. परिणामी त्याभागावर येणारे केस हे तुलनेने रखरखीत असतात. आणि त्याभागातील त्वचेला काळपटपणा येतो. तसेच पुळ्या देखील येतात. पण कटोरी वॅक्स केल्यामुळे तुमची त्वचा सुंदर आणि मुलायम राहील. ( हे पण वाचा-चमकदार आणि मुलायम त्वचेसाठी आंघोळीच्या पाण्यात टाका दूध, मग बघा कमाल! )

 त्वचेसाठी फायदेशीर

Image result for face waxing

जर तुम्ही नको असलेले केस काढण्यासाठी त्वचेवर रेजरचा वापर करत असाल तर केसांची वाढ लगेच होते. पण जर तुम्ही अशा पद्धतीने वॅक्सिंग कराल त्वचा चांगली राहते. त्वचेला वेदना होत नाहीत.( हे पण वाचा-टॅटूमुळे होत असलेले इन्फेक्शन रोखण्यासाठी 'या' गोष्टींची घ्या काळजी)

हेअर ग्रोथ कमी होते. 

(image credit-good house keeping)

हेअर ग्रोथ कमी करण्यासाठी हे घरच्याघरी केलेलं वॅक्स फायदेशीर ठरतं असतं. वॅक्स केल्यामुळे त्वचेचा काळपटपणा दूर होत असतो.  त्वचेच्या मृतपेशी निघून जाण्यास मदत होते. शरीरात तसंच  त्वचेवर रक्ताभिसरण व्यवस्थित होते. त्यामुळे तुमचा चेहरा टवटवीत आणि गुलाबी दिसू शकतो. 

Web Title: Best solution for waxing Know benefits of kattori wax

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.