शहरं
Join us  
Trending Stories
1
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
2
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
3
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं
4
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
5
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
6
'बिग बॉस १९'साठी 'तारक मेहता'लाच ऑफर? मेकर्सने केली विचारणा; अभिनेत्याच्या होकाराची प्रतीक्षा
7
Mangalagauri 2025: पूजा होईपर्यंत बोलायचे नाही, असा मंगळागौरीच्या पूजेचा नियम का?
8
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
9
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
10
बाजारात जोरदार 'कमबॅक'! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, हिरो मोटर्ससह 'या' शेअर्सचा बंपर परतावा
11
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?
12
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
13
एक दिवस एमजी टाटाला मागे टाकणार? जुलैमध्ये एवढ्या विकल्या इलेक्ट्रीक कार... ह्युंदाई क्रेटा...
14
Viral Video: पाठीमागून आला अन् मिठी मारली, छातीलाही केला स्पर्श; भररस्त्यात महिलेसोबत घाणेरडं कृत्य!
15
भारतातील एकमेव रेल्वे स्टेशन, ज्याला नावच नाही, तरीही थांबते ट्रेन, लोक करतात प्रवास
16
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
17
IND vs ENG :मियाँ मॅजिक! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये विकेट; KL राहुलनं एक कॅच सोडला
18
IND vs ENG : क्रिस वोक्सला सलाम! खांदा फॅक्चर असताना संघासाठी मैदानात उतरला (VIDEO)
19
शाहरुख खान अन् राणी मुखर्जीसाठी प्रिय मित्र करण जोहरची पोस्ट, म्हणाला, "३३ वर्षांचा हा काळ..."
20
थ्रेडिंगमुळे लिव्हर फेल? आयब्रो करणं पडेल चांगलंच महागात, डॉक्टरांचा धोक्याचा इशारा

Valentine Day : डिफ्रंट लूकसाठी 'या' नेलआर्ट डिझाइन्स करतील मदत!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2019 14:15 IST

'व्हॅलेंटाइन डे' अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. तुम्हीही तुमच्या पार्टनरसोबत बाहेर जाण्यासाठी खास प्लॅन केला असेलच. पण या व्हॅलेंटाइन डेसाठी तुमच्या चेहऱ्यासोबतच नखांच्या सौंदर्यावरही लक्ष दिलं तर तुमचा लूक आणखी सुंदर दिसेल.

'व्हॅलेंटाइन डे' अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. तुम्हीही तुमच्या पार्टनरसोबत बाहेर जाण्यासाठी खास प्लॅन केला असेलच. पण या व्हॅलेंटाइन डेसाठी तुमच्या चेहऱ्यासोबतच नखांच्या सौंदर्यावरही लक्ष दिलं तर तुमचा लूक आणखी सुंदर दिसेल. अनेकदा आपण आपल्या चेहऱ्याचा लूक आणखी चांगला कसा होईल याकडे जास्त लक्ष देतो. पण अशातच नखांकडे मात्र दुर्लक्ष करतो. 

चेहऱ्याचं सौंदर्य वाढविण्यासाठी ज्याप्रमाणे आपण मेकअपचा आधार घेतो. त्याचप्रमाणे हातांचं सौंदर्य वाढविण्यासाठी नेलपेंट किंवा नेलपॉलिशचा वापर करण्यात येतो. नखांचं सौंदर्य वाढविण्यासाठी अनेक मुली नेलपॉलिशचा वापर करतात. सध्या नेलपेंट आणखी आकर्षक पद्धतीने लावण्यासाठी नेल आर्ट करण्यात येतं. 'व्हॅलेंटाइन डे'साठी खास लूक करण्यासाठी तुम्हीही नेल आर्टच्या मदतीने तुमच्या चेहऱ्याच्या सौंदर्यासोबतच नखांचं सौंदर्यही खुलवू शकता. त्यासाठी आम्ही तुम्हाला काही खास नेल आर्ट्स डिझाइन्स सांगणार आहोत. ज्यांचा वापर करून तुम्ही तुमचा कम्पलिट 'व्हॅलेंटाइन डे' लूक मिळवू शकता.

अनेकदा नेलपेंट विकत घेताना अनेक प्रश्नांचा सामना करावा लागतो. कोणता शेड आपल्या नखांवर शोभून दिसेल? किंवा आपल्या स्किन टोनला कोणती नेलपेंट सूट होईल? याबाबत गोंधळ उडतो. नेलआर्टबाबतही काहीसं तसचं असतं. कोणती डिझाइन करायची? नखांवर सूट होईल ना? यांसारखे अनेक प्रश्न भंडावून सोडतात. आम्ही काही सिंम्पल नेलआर्ट डिझाइन्स सांगणार आहोत. ज्यांचा वापर करून तुम्ही नक्कीच तुमचा लूक आणखी सुंदर करू शकता. 

याव्यतिरिक्त नखांची काळजी घेण्यासाठी काही टिप्स :

1. आठवड्यातून एकदा तरी हातांना मालिश करा, त्यामुळे ब्लड सर्क्युलेशनमध्ये वाढ होण्यास मदत होते. फक्त हातांनाच नाही तर नखांनाही मालिश करणं आवश्यक असतं. त्यामुळे नखांच्या वाढिसोबतच नखं आकर्षक होण्यासही मदत होतं. 

2. नेल पॉलिश अधिकाधिक वेळ नखांवर टिकवून ठेवण्यासाठी नेल पॉलिश लावल्यानंतर ती व्यवस्थित सुकू द्या. त्यानंतर बर्फाच्या पाण्यामध्ये 30 सेकंदांसाठी ठेवा. 

3. नेल पॉलिश जेव्हा नखांवरून निघू लागेल त्यावेळी टचअप न करता. नेलपेंट रिम्हूवर वापरून ती काढून टाका आणि पुन्हा नेटपेंट नव्याने लावा. त्याच नेलपेंटवर टचअप केल्याने नखांचा लूक बिघडू शकतो. 

4. आपल्या नखांना मजबूत ठेवण्यासाठी आणि तुटण्यापासून वाचवण्यासाठी सफरचंदाच्या व्हिनेगरचा वापर करा. यासाठी अर्धा कप सफरचंदाचं व्हिनेगर आणि अर्धा कप ऑलिव्ह ऑइल मिक्स करा. त्यामध्ये 10 मिनिटांपर्यंत हात बुडवून ठेवा. त्यानंतर 5 मिनिटं हलक्या हाताने नखांवर मसाज करा. त्यानंतर कोमट पाण्याने नखं स्वच्छ धुवून टाका. 

5. नखांची देखभाल करण्यासाठी नारळाचं तेल वापरा नारळाचं तेल नखांसाठी फार फायदेशीर ठरतं. दररोज रात्री झोपण्यापूर्वी नारळाचं तेल नखांना लावून मसाज केल्यानंतर नखं मजबूत होण्यास मदत होते. तसचे नेलपेंट लावल्यानंत स्मूद लूक मिळण्यास मदत होते. 

6. जर तुम्ही नेल आर्ट करण्याचा विचार करत असाल तर डार्क कलरच्या नेलपेंटचे दोन कोट लावा. व्यवस्थित सुकल्यानंतर टूथपिकच्या मदतीने नखांवर डिझाइन करा. त्यामुळे नेल आर्टच्या डिझाइनने नखांना त्रास होणार नाही. 

7. ऑलिव्ह ऑइल नखांच्या मजबूतीसाठी फार फायदेशीर असतं. लिंबाच्या रसामध्ये थोडं ऑलिव्ह ऑइल मिक्स करून नखांना मसाज करा. यामुळे नखं चमकदर होण्यास मदत होईल. 

आणखी काही नेलआर्ट डिझाइन :

टॅग्स :Valentine Dayव्हॅलेंटाईन्स डेfashionफॅशनBeauty Tipsब्यूटी टिप्सValentine Weekव्हॅलेंटाईन वीक