फेस्टिव्ह सीझनमध्ये नटून थटून तयार होण्याची बात काही औरच... सण किंवा एखादं लग्न यांसारख्या दिवशी सजण्याची संधी मिळते. आता नवरात्रोत्सव संपला असला तरिही दीवाळी काही दिवसांवरच आहे. अशातच दिवाळी पार्टीसाठी सजण्याचा विचार करत असाल आणि त्यावेळी जर बॅकलेस ब्लाउज किंवा बॅकलेस कुर्ता वेअर करायचा विचार केला असेल तर थोडं थांबा. असा कोणताही प्लान करण्याआधी सर्वात आधी तुमच्या पाठीवर लक्ष द्या. कारण पाठीचा भाग अनेकदा आपल्या आउटफिट्समुळे कव्हर होतो पण तरिही टॅन असतो. तसेच पाठीवर अनेक ब्लॅक स्पॉट्सही असतात. अशातच पाठीचा भाग ग्लोइंग आणि क्लीन असणं आवश्यक आहे. आज आम्ही पाठीची त्वचा तेलदार करण्यासाठी आम्ही काही उपाय सांगणार आहोत. 

आपण सर्व काकडीचा वापर सलाड म्हणून करतो. परंतु, याचा वापर केल्याने काळी मान आणि पाठही तजेलदार करता येते. मानेचा काळपटपणा दूर करण्यासाठी काकडी किसून मानेवर आणि पाठीवर लावून मसाज करा. असं केल्याने मान आणि पाठीचा काळपटपणा दूर होण्यास मदत होते. 

संत्र्यामध्ये व्हिटॅमिन सी आढळून येतं. जे त्वचेचा रंग उजळवण्यासाठी मदत करतं. सर्वात आधी संत्र्याचा गर सुकवून त्याची पेस्ट तयार करा. आता तयार पेस्ट मानेवर आणि पाठिवर लावा. काही वेळ ठेवून त्यानंतर पाण्याने धुवून टाका. त्वचा उजळवण्यास मदत होइल. 

दही त्वचेचा काळपटपणा दूर करण्यासाठी मदत करतो. यामध्ये आढळून येणारे नैसर्गिक तत्व डाग दूर करून त्वचा नितळ करण्यासाठी मदत करतात. मान आणि पाठीवरील काळपटपणा दूर करण्यासाठी दह्याचा वापर करणं फायदेशीर ठरतं. 

मध त्वचा मॉयश्चराइज्ड करतं आणि टोमॅटो त्वचा उजलवण्यासाठी मदत करतं. हे दोन्ही एकत्र करून लावल्याने मान आणि पाठीचा रंग स्वच्छ होतो. मधामध्ये टोमॅटोचा रस एकत्र करून 20 मिनिटांसाठी मान आणि पाठीवर लावा. काही वेळ तसचं ठेवा त्वचेचा रंग उजळवण्यास मदत होते. 

पाठीची त्वचा उजळवण्यासाठी बेकिंग सोडा आणि पाणी एकत्र करून पेस्ट तयार करा आणि पाठीवर लावा. थोड्या वेळानंतर गुलाब पाण्याच्या मदतीने हळूहळू स्वच्छ करा. मान आणि पाठीचा काळपटपणा दूर करण्यासाठी आंघोळीच्या 10 मिनिटांआधी बटाट्याची चकती घेऊन मसाज करा. किंवा तुम्ही बटाट्याच्या रसामध्ये लिंबाचा रस एकत्र करून लावू शकता. 

चेहरा आणि मानेवर येणारा घाम आपण अगदी सहज पुसू शकतो. पण पाठीवर येणारा घाम पुसणं अशक्य असतं. त्यामुळे पाठीच्या त्वचेवरील रोमछिद्र बंद होतात. परिणामी पाठीवर अॅक्ने, रॅशेज, ब्लॅकहेड्स यांसारख्या समस्या उद्भवतात. अनेकदा टॅनिंगमुळे पाठीचा लूक बिघडतो. 

(टिप : वरील सर्व उपाय घरगुती आहेत आणि केवळ माहिती म्हणून आम्ही हे वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. प्रत्येकाची त्वचा वेगळी असते त्यामुळे सर्वच उपाय सर्वांच्याच त्वचेसाठी फायदेशीर असतील असं नाही किंवा असा दावाही आम्ही करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरेल.)

Web Title: Best home remedies to get clean back

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.