मोहरीच्या तेलात कढीपत्ते टाकून तयार करा हेअर मास्क, केस मुळापासून होतील मजबूत!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2024 13:34 IST2024-11-30T13:33:04+5:302024-11-30T13:34:17+5:30
Hair Pack : या तेलाने आणि हिरव्या पानांनी केस मजबूत होतात, केसांची वाढ होते, मुलायम होतात आणि काळे राहतात. हे खास पान म्हणजे कढीपत्ता.

मोहरीच्या तेलात कढीपत्ते टाकून तयार करा हेअर मास्क, केस मुळापासून होतील मजबूत!
Hair Pack : जर तुम्हाला केस काळे, चमकदार आणि लांब बनवायचे असतील तर यासाठी एक प्रभावी आणि नॅचरल उपाय आहे. यासाठी तुम्हाला फक्त मोहरीचं तेल आणि खास हिरव्या पानांची गरज लागेल. या तेलाने आणि हिरव्या पानांनी केस मजबूत होतात, केसांची वाढ होते, मुलायम होतात आणि काळे राहतात. हे खास पान म्हणजे कढीपत्ता.
खास हेअर पॅक
हा हेअर पॅक तयार करण्यासाटी २ चमचे मोहरीचं तेल घ्या आणि १० ते १२ कढीपत्ते घ्या. तसेच गरजेनुसार पाणी घ्या. सगळ्यात आधी मोहरीचं तेल एका पॅनमध्ये टाकून हलकं गरम करा. नंतर त्यात कढीपत्त्याची काही पाने टाका. जेणेकरून पानांमधील पोषण तेलात मिक्स होईल.
कसा लावाल हा हेअर पॅक?
हे तेल केसाच्या मुळात लावून मालिश करा. साधारण १ ते २ तासांपर्यंत हा मास्क केसांवर लावून ठेवा. नंतर माइल्ड शाम्पूने केस धुवून घ्या. तुम्ही आठवड्यातून दोन ते तीन वेळा या तेलाचा वापर करू शकता.
या पॅकचे फायदे?
मोहरीचं तेल आणि कढीपत्त्यात प्रोटीन आणि व्हिटॅमिन्स असतं. ज्याने केस मुळापासून मजबूत होतात आणि केसांची वाढही होते. त्याशिवाय या पानांमध्ये अॅंटी-ऑक्सिडेंट्स असतात जे केस पांढरे होण्याची प्रक्रिया स्लो करतात आणि केस काळे ठेवण्यास मदत करतात. तसेच या हेअर पॅकने केसांना पोषण मिळतं आणि केसगळतीही थांबते.