बदाम भिजवून खाण्याचे फायदे

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2016 16:28 IST2016-04-07T23:28:25+5:302016-04-07T16:28:25+5:30

बदाम भिजवून खाल्ल्याने पचनक्रिया सुधारते.

Benefits of eating almonds soak | बदाम भिजवून खाण्याचे फायदे

बदाम भिजवून खाण्याचे फायदे

ाम खाण्याचे अनेक फायदे आहेत. बदाम हे आरोग्यासाठी उत्तम आहे. भिजवलेले बदाम तर सर्वोत्तम आहे. जर तुम्हाला बदाम भिजवून खाणे आवडत नसेल, तर तुमचा विचार बदला. कारण नुसते बदाम खाण्यापेक्षा ते भिजवून खाण्याचे फायदे अनेक आहेत. 
बदामावरील टरफले काढून खाणं हे फायद्याचं आहे. बदामाच्या टरफलांमध्ये टॅनिन नावाचं तत्व असते. त्यामुळे टरफलासह बदाम खाल्याने बदामाची पूर्ण पोषकतत्त्वं शरिरात जात नाहीत.
- बदाम भिजवून खाल्ल्याने पचनक्रिया सुधारते.
- याशिवाय वजन घटवण्यासाठीही भिजवलेले बदाम फायदेशीर ठरू शकतात.
- भिजवलेल्या बदामांमुळे सौंदर्य टिकवण्यात, चेहºयावर सुरकुत्या न पडू देण्यास, तसेच चेहरा टवटवीत दिसण्यास मदत होते.
- भिजवलेल्या बदामांमध्ये ब17 जीवनसत्त्व आणि फॉलिक असिड असल्यामुळे कॅन्सरचा धोका दूर ठेवण्यास मदत होते.

Web Title: Benefits of eating almonds soak

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.