​Beauty Tips : वॅक्सिंगवर सोपा उपाय ‘एपिलेटर’!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2017 18:39 IST2017-04-11T13:09:48+5:302017-04-11T18:39:48+5:30

एपिलेटर एक अशी मशीन आहे जे सुरक्षित पद्धतीने अनावश्यक केस दूर करते.

Beauty Tips: Waxing Simple Remedy 'Epilator'! | ​Beauty Tips : वॅक्सिंगवर सोपा उपाय ‘एपिलेटर’!

​Beauty Tips : वॅक्सिंगवर सोपा उपाय ‘एपिलेटर’!

ong>-Ravindra More
बहुतांश महिला शरीरावरील अनावश्यक केसांपासून सुटका मिळविण्याठी वॅक्सिंग करतात. पण हे त्रासदायक असल्याने महिला नाक मुरडतात. आज आम्ही तुम्हाला अनावश्यक केस काढण्यासाठी जो उपाय सांगणार आहोत तो नेहमीपेक्षा वेगळा आहे. एपिलेटर एक अशी मशीन आहे जे सुरक्षित पद्धतीने अनावश्यक केस दूर करते.

एपिलेशन ही केस काढण्याची सुविधाजनक पद्धत आहे. कोणत्याही प्रकारचे हेअर रिमूव्हल उपकरण वापरण्यापूर्वी आपण त्याची संपूर्ण माहिती जाणून घेतो. म्हणूनच आम्ही आज तुम्हाला एपिलेटरविषयी माहिती सांगणार आहोत. 



एपिलेटर म्हणजे काय ?
एपिलेटरमध्ये एक ट्वीजरसारखे तंत्र असते जे तुमच्या केसांना ओढायचे कार्य करते. यामध्ये अनेक ट्वीजर एकावेळी कार्यरत असतात. 

वापर कसा करावा
ज्या ठिकाणचे केस काढायचे आहेत त्या ठिकाणी एपिलेटर चालवले की केस सहज निघतात. अंघोळीनंतर हे वापरणे योग्य आहे. काही असेही एपिलेटर आहेत जे तुम्ही अंघोळीदरम्यान वापरू शकता. 

हे त्रासदायक आहे का ?
हे मुळीच वेदनादायी आहे असे नाही. कोणतीही गोष्ट ज्यामुळे केस ओढले जातात, ती गोष्ट वेदनादायी असेलच. परंतु वॅक्सिंगच्या तुलनेत एपिलेटरमुळे वेदना कमी जाणवते. 

Web Title: Beauty Tips: Waxing Simple Remedy 'Epilator'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.