BEAUTY TIPS : चंदनाने द्या उन्हाळ्यात त्वचेला गारवा !
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2017 15:28 IST2017-03-18T09:58:15+5:302017-03-18T15:28:15+5:30
चंदन आपल्या मोहक सुगंधासोबतच शीतल गुणांसाठीही ओळखले जाते. चंदनामुळे त्वचा मऊ व चमकदार होते. त्वचेच्या अनेक समस्या दूर होतात.

BEAUTY TIPS : चंदनाने द्या उन्हाळ्यात त्वचेला गारवा !
उन्हाळ्याची चाहूल लागली असून उन्हाच्या तडाखा जाणवायला लागला आहे. उन्हामुळे बऱ्याच शारीरिक समस्या उद्भवतात. त्यातील महत्त्वाची म्हणजे त्वचेची समस्या होय. त्वचेच्या समस्यांपासून बचावासाठी बरेच उपाय केले जातात. त्यासाठी महागड्या सौंदर्य प्रसाधनांवर अमाप पैसाही खर्च केला जातो.
मात्र सर्वात प्रभावी उपाय म्हणजे चंदन होय. चंदन आपल्या मोहक सुगंधासोबतच शीतल गुणांसाठीही ओळखले जाते. चंदनामुळे त्वचा मऊ व चमकदार होते. त्वचेच्या अनेक समस्या दूर होतात. चंदन पावडर लावताना काही गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहे.
चंदनाचा वापर कसा कराल?
* प्रथमत: एक चमचा चंदन पावडर घ्या. जर तुमच्याकडे पावडर नसेल तर चंदनाचे लाकूड दगडावर घासून चंदन काढून घ्या.
* नंतर चंदनामध्ये एक चमचा दूध किंवा गुलाबजल टाका. त्यात हळदही टाकू शकता. हळदीत अँटीसेप्टीक गुण असतात. दुधामुळे चेहऱ्याच्या त्वचेला मऊपणा प्राप्त होतो आणि गुलाबजलमुळे फ्रेशनेस येतो. हळदीचा वापर करायचा नसल्यास हरकत नाही.
* पूर्ण चेहऱ्यावर पेस्ट लावून घ्या. पेस्ट सगळीकडे समप्रमाणात लागली आहे ना, याकडे लक्ष द्या.
* पेस्ट वाळत नाही तोपर्यंत चेहरा धुवू नका. कमीतकमी २० मिनिटानंतर चेहरा धुवून घ्या. यानंतर तो मऊ कापडाने पुसून घ्या. तुम्हाला चेहऱ्यावर ग्लो स्पष्ट जाणवेल.
हा उपाय आठवड्यातून एकदा जरी केला तरी त्याचा परिणाम लवकरच दिसायला लागेल.
Also Read : BEAUTY TIPS : चॉकलेट फेशियलने खुलवा सौंदर्य !