BEAUTY TIPS : चॉकलेट फेशियलने खुलवा सौंदर्य !

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2017 14:37 IST2017-02-14T09:04:00+5:302017-02-14T14:37:16+5:30

चॉकलेट फेशियलने फक्त त्वचेचेच सौंदर्य खुलत नाही तर यामुळे त्वचेला पोषणही मिळते. चॉकलेट फेशियलदेखील अनेक प्रकारचे आहे.

BEAUTY TIPS: Chocolate fashions open beauty! | BEAUTY TIPS : चॉकलेट फेशियलने खुलवा सौंदर्य !

BEAUTY TIPS : चॉकलेट फेशियलने खुलवा सौंदर्य !

ong>-Ravindra More

चॉकलेट फेशियलने फक्त त्वचेचेच सौंदर्य खुलत नाही तर यामुळे त्वचेला पोषणही मिळते. चॉकलेट फेशियलदेखील अनेक प्रकारचे आहे. जर आपणास आपल्या स्कीनचा प्रकार माहित असेल तर त्यासाठी योग्य फेशियलची आपण सहज निवड करु शकाल. 

सर्वात महत्त्वाची आणि चांगली गोष्ट म्हणजे आपण चॉक लेट फे शियल घरीसुद्धा बनवू शकाल. त्यासाठी काही प्रमाणात कोकोआ पावडरला दहीत मिक्स करु न एक पेस्ट तयाार करा आणि त्याला चेहऱ्यावर लावा. हा एक उत्तम प्रकारचा चॉक लेट फेशियल आहे. याचा दुसरा फायदा असा पण आहे की, चॉकलेटला एक विशिष्ट सुगंध असतो, जो चेहऱ्यावर लावल्याने रिलॅक्स वाटण्यात मदतही होते. जर आपली त्वचा खूप संवेदनशील आहे तर चॉकलेट फे शियलशिवाय दुसरा उत्तम पर्याय कोणताही नाही. चॉकलेट फेशियलमुळे अजून काय फायदे आहेत याबाबत जाणून घेऊया.

* उच्च मात्रेत अ‍ॅण्टिआॅक्सिडेंट
चॉकलेट फेशियलमध्ये उच्च मात्रेत अ‍ॅण्टिआॅक्सिडेंट असतो ज्यामुळे त्वचेवरील सुरकुत्या आणि बारीक रेषा नष्ट होतात. याशिवाय आपला चेहरा साफ दिसावा असे वाटत असेल तर चॉकलेट फे शियल आपल्यासाठी खूपच फायदेशीर आहे.

* वाढत्या वयाची लक्षणे लपविते
चॉकलेट फेशियलचा वापर केल्याने वाढत्या वयाची लक्षणे चेहऱ्यावर दिसत नाही. यातील पर्याप्त प्रमाणात असलेल्या अ‍ॅण्टिआॅक्सिडेंटमुळे चेहऱ्यावर चकाकी येण्यास मदत होते. त्यामुळे कोणत्याही दुसऱ्या फेशियलच्या तुलनेने चॉकलेट फेशियल अधिक फायदेशीर आहे. 

* चेहऱ्यावरील डाग नाहीसे होतात
चेहऱ्यावर डाग असणे ही सामान्य समस्या आहे. चॉकलेट फेशियलच्या नियमित  वापराने त्वचेवरील डाग सहजपणे दूर होतात आणि त्वचा डागरहीत, सुंंदर होते. 

Also Read : ​चेहऱ्यावरील सुरकुत्या टाळण्यासाठी !
                     : ​चेहऱ्यावरील सुरकुत्या टाळण्यासाठी !​सुंदर व स्वस्थ त्वचेसाठी करा फेशियल

Web Title: BEAUTY TIPS: Chocolate fashions open beauty!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.