BEAUTY : चेहऱ्यावर वाफ (स्टीम) घ्या अन् सौंदर्य वाढवा !
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2017 17:28 IST2017-01-31T11:58:24+5:302017-01-31T17:28:24+5:30
रोजच्या धावपळीत प्रदूषणाचा मारा चेहऱ्यावर झाल्याने त्वचेवर विपरित परिणाम होऊन पिंपल्स, ब्लॅकहेड्स निर्माण होतात, त्यामुळे आपले सौंदर्यात बाधा निर्माण होते.

BEAUTY : चेहऱ्यावर वाफ (स्टीम) घ्या अन् सौंदर्य वाढवा !
रोजच्या धावपळीत प्रदूषणाचा मारा चेहऱ्यावर झाल्याने त्वचेवर विपरित परिणाम होऊन पिंपल्स, ब्लॅकहेड्स निर्माण होतात, त्यामुळे आपले सौंदर्यात बाधा निर्माण होते. ही समस्या दूर करण्यासाठी सर्वात सोपा व चांगला उपाय म्हणजे वाफ घेणे होय. जर आपण हा उपाय घरच्याघरी केला तर पार्लरच्या तुलनेने अधिक चांगल्या पद्धतीने आणि सावधपणाने करु शकता. आज आम्ही आपणास घरगुती वाफ कशी आणि केव्हा घ्यावी याबाबत जाणून घेऊ या.
कसे कराल स्टीमिंग
* आपण आपल्या घरातच स्टीमर किंवा कॅटलीच्या साह्याने वाफ घेऊ शकता. याशिवाय मोठ्या भांड्याच्या साह्यानेही वाफ घेऊ शकता. अगोदर आपल्या चेहऱ्याला दूध किंवा दहीत बुडवलेल्या कापसाच्या बोळ्याने साफ करा आणि त्यांनतर चेहऱ्यावर वाफ घ्या.
* आपला चेहरा स्टीमरवर ठेवून डोक्याला चांगल्याप्रकारे बाथरुमच्या टॉवेलने झाकून घ्या. आपण आपल्या इच्छेनुसार पाण्यात लिंबू, आवश्यक तेल किंवा फुलांच्या पाकळ्यादेखील टाकू शकता.
* आपल्या चेहऱ्याला स्टीमरजवळ असू द्या मात्र, आपला चेहरा वाफेने जळू नये याचीही काळजी घ्या. यासाठी आपल्या डोळ्यांना बंद ठेवा आणि श्वासाद्वारे वाफेला आत ओढा. जर पाणी जास्त गरम असेल तर डोक्याला लगेच त्यावरून हटवा आणि वाफ सहन करण्यासारखी असेल तर पुन्हा त्याच्या जवळ या. १०-१५ मिनिटानंतर आपल्या चेहऱ्याला थंड पाण्याने धुवा.
* वाफ घेतल्याने काय होतात फायदे-
* वाफ घेतल्याने पिंपल्स पसरविणारे बॅक्टेरिया नष्ट होतात आणि त्वचा पुन्हा श्वास घेऊ लागते. घरच्याघरी वाफ घेतल्याने विनाकारण स्क्रबिंग करण्यापासून सुटका मिळते.
* स्टीम घेतल्यानंतर एक -दोन दिवसानंतर पिंपल्सने भरलेला चेहरा थोडा खराब वाटू शकतो. पण काही दिवसानंतर आपला चेहरा सुंदर दिसू लागतो. आपल्या चेहऱ्यावरचे सर्व डाग नाहीसे होतात आणि चेहरा खूप स्वच्छ दिसू लागतो.
* रुक्षपणापासून सुटका
थंडीत बहुतांश जणांची त्वचा रुक्ष होते. अशावेळी स्टीमिंग केल्यास त्वचेचा रुक्षपणा दूर होऊन चेहऱ्याची चकाकी वाढते.
Also Read : BEAUTY : चेहऱ्यावरील सुरकुत्या टाळण्यासाठी !
: घरगुती उपाय करा अन् स्किन उजाळा !