शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
6
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
7
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
8
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
9
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
10
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
11
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
12
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
13
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
14
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
15
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
16
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
17
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
18
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
19
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
20
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
Daily Top 2Weekly Top 5

दीपिका आणि प्रियंकाप्रमाणे दिसायचंय? त्यांचे 'हे' ब्युटी सिक्रेट् फॉलो करा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2019 16:42 IST

बॉलिवूड अभिनेत्री आणि त्यांच्या घायळ करणाऱ्या सौंदर्याची बात काही औरच... या अभिनेत्रींच्या फॅशनपासून त्यांची स्टाइल कॉपी करण्याची अनेक तरूणींची धडपड असते.

बॉलिवूड अभिनेत्री आणि त्यांच्या घायळ करणाऱ्या सौंदर्याची बात काही औरच... या अभिनेत्रींच्या फॅशनपासून त्यांची स्टाइल कॉपी करण्याची अनेक तरूणींची धडपड असते. दीपिका आणि प्रियंकाप्रमाणे बीटाउनच्या हॉट अभिनेत्रींप्रमाणे आपणही दिसावं अशी अनेक तरूणींची इच्छा असते. त्यासाठी त्या अनेक उपाय करत असतात. एवढचं नाही तर अनेकदा बाजारातील महागड्या प्रोडक्ट्सचाही त्या वापर करत असतात. आज आम्ही तुमचं काम थोडंसं सोपं करणार आहोत आणि बॉलिवूडच्या सर्वात सुंदर अभिनेत्रींच्या ब्युटी सीक्रेट्सबाबत सांगणार आहोत. 

ऐश्वर्या राय बच्चन

ऐश्वर्या फक्त भारतातीलच नव्हे तर जगभरातील सर्वात सुंदर महिलांपैकी एक. लग्न आणि त्यानंतर आई झाल्यानंतरही तिच्या सौंदर्यात कणभरही फरक जाणवतं नाही. ऐश्वर्या आपलं सौंदर्य आणखी बहरवण्यासाठी जास्तीतजास्त नॅचरल प्रोडक्ट्सचा वापर करते. ती दही, काकडी, बेसन यांसारख्या पदार्थापासून तयार करण्यात आलेल्या फेसपॅकचा वापर करते. त्याचबरोबर ती आठवड्यातून एकदा केसांना तेल लावून मालिशही करते. 

दीपिका पादुकोण

दीपिकाचं सौंदर्य आणि फिटनेसवर अनेक तरूण-तरूणीचं नाही तर बॉलिवूडच्या इतर अभिनेत्रीही पिदा आहेत. काही दिवसांपूर्वीच आलियाने दीपिकाची फिगर आणि तिच्या सौंदर्याची तारिफ केली होती. सूत्रांच्या म्हणण्यानुसार, दीपिका आपल्या फ्लॉलेस स्किनसाठी जंक फूडपासून शक्य तेवढी लांबच राहते. त्याचबरोबर ती लिक्विड इंटेक मोठ्या प्रमाणावर घेते. यामुळे स्किन सॉफ्ट होण्यास मदत होते. या सर्व गोष्टींसोबतच ती एक्सरसाइजवरही लक्ष देते. जेव्हा केव्हा बीझी शेड्यूलमधून थोडा वेळ मिळेल तेव्हा ती स्पा घेण्यास अजिबात विसरत नाही. स्पामुळे स्किन पोर्स क्लिन होतात आणि स्किन मुलायम होते. दीपिका रात्री नाइट क्रिम आणि दिवसा SPF असलेल्या क्रिम्स वापरते. 

करीना कपूर

करीना कपूरच्या तर जीन्समध्येच सौंदर्य आहे, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. करिनाने  प्रेग्नेंसीनंतर स्वतःला फिट ठेवलं असून तिने आपलं सौंदर्यही जपलं आहे. ती आपल्या केसांवर ऑलिव्ह ऑइल, बदामाचं तेल आणि एरंडेल तेल एकत्र करून लावते. तसेच त्वचेसाठी ती मधाचा वापर करते. त्यामुळे त्वचा चमकदार दिसण्यासोबतच तजेलदार होण्यासही मदत होते. 

कतरीना कैफ

कटरीना त्या अभिनेत्रींपैकी एक आहे जी आपल्या कॉन्फिडेंससोबत नो-मेकअप लूक कॅरी करते. ती मेकअपशिवायही फार सुंदर दिसते. यासाठी ती चेहऱ्यावर आइलने मसाज करते. ज्यामुळे स्किन ग्लो होण्यासोबतच मुलायमही होते. त्याचबरोबर मेकअपमुळे होणारा ड्रायनस दूर करतं. केसांना कटरिना ड्रायरशिवाय म्हणजेच एअर ड्राय करणं पसंत करते. 

प्रियंका चोप्रा

प्रियंकाची गॉर्जियस स्किनवर तर हॉलिवूड अभिनेत्रीही फिदा आहेत. यासाठी प्रियंका चेहऱ्यावर दही आणि हळदीचा पॅक लावते. ज्यामुळे त्वचेचा रंग उजळण्यासोबतच स्किनवरील अशुद्ध घटकही दूर करण्यासाठी मदत होते. प्रियंका आपल्या केसांना दररोज रात्री तेल लावते आणि सकाळी शॅम्पूने स्काल्प क्लिन करते. त्याचबरोबर ज्यादिवशी तिला शूटिंग नसतं त्यादिवशी ती मेकअपपासून लांब राहते. 

टॅग्स :Beauty Tipsब्यूटी टिप्सbollywoodबॉलिवूडCelebrityसेलिब्रिटीAishwarya Rai Bachchanऐश्वर्या राय बच्चनPriyanka Chopraप्रियंका चोप्राDeepika Padukoneदीपिका पादुकोणKatrina Kaifकतरिना कैफKareena Kapoorकरिना कपूर