Beauty : सौंदर्य वाढविण्यासाठी घरगुती उपाय !
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2018 12:03 IST2017-10-04T10:37:20+5:302018-06-23T12:03:35+5:30
आज आम्ही आपणास काही घरगुती उपायांबाबत माहिती देत असून त्याद्वारे आपले सौंदर्य खुलण्यास आणि ते कायम टिकण्यास मदत होईल.
.jpg)
Beauty : सौंदर्य वाढविण्यासाठी घरगुती उपाय !
>आपल्या आवडत्या अभिनेत्रींसारखे आपणही सुंदर दिसावे असे प्रत्येक तरुणीला वाटते. त्यासाठी बहुतेक तरुणी महागडे सौंदर्य प्रसाधनांचा वापर करतात. तासंतास ब्यूटी पार्लरमध्ये वेळ घालवितात, मात्र परिणाम हा तात्पुरताच मिळतो. आज आम्ही आपणास काही घरगुती उपायांबाबत माहिती देत असून त्याद्वारे आपले सौंदर्य खुलण्यास आणि ते कायम टिकण्यास मदत होईल.
* गव्हाच्या कोंड्यात भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन ‘इ’असते. त्यामुळे सौंदर्य वाढीसाठी गव्हाच्या कोंड्याचा वापर होऊ शकतो. त्यासाठी गव्हाचा कोंडा साईसकट दुधात एकत्र करुन जाडसर लेप तयार करावा. हा लेप चेहऱ्यावर लावल्यास त्वचेचा रंग उजाळण्यास मदत होते. तेलकट त्वचा असेल तर मलई ऐवजी दही व मध घ्यावे.
* एक चमचा मध, एक चमचा काकडीचा रस आणि एक चमचा संत्र्याचा रस घ्यावा. हे सर्व मिक्स करुन चेहऱ्याला १५ ते २० मिनिटांपर्यंत लावावे. याचा क्रिम म्हणून उपयोग होऊन चेहऱ्याच्या त्वचेची गुणवत्ता वाढते.
* जायफळाचा उपयोग चेहऱ्याचे सौंदर्य खुलविण्यासाठी होतो. त्यासाठी जायफळ पाण्यात उगळून पिंपल्स व डोळ्याभोवती काळी वर्तुळ असेल तर लावावे.
* टोमॅटोचा रस १ चमचा, काकडीचा रस एक चमचा, कोबीचा रस एक चमचा हे सर्व मिक्स करून चेहऱ्यावर लावल्यास काळे डग व वर्तुळे कमी होतात. पिंपल्स जास्त असेल तर कोबी किसुन त्यात जायफळ पेस्ट मिसळुन जाडसर भार चेहऱ्यावर देणे.
* टोमॅटोच्या आतील गर स्मॅश करुन चेहऱ्यावर लावणे. चेहऱ्यावर चमक येते व चेहरा निखरतो.
* चेहऱ्यावर सुरकुत्या असेल तर सफरचंद किसून त्यात एक चमचा कच्चे दुध टाकुन व ही पेस्ट चेहऱ्यावर लावणे.
* चेहऱ्यावर पिंपल्स व पिंपल्सचे डाग असेल तर तुळशीच्या पानाचा रस १ चमचा पुदीन्याचा रस व थोडे हळद पेस्ट करून हे मिश्रण पाण्यात करुन घेणे
* उन्हाळ्याच्या दिवसात उन्हापासून रक्षण करण्यासाठी काकडीचा रस चेहऱ्याला लावून बाहेर पडणे.
* केस गळत असेल तर जास्वंद जेलने केसांची मसाज करणे.
* कोरफड जेलने केसांची मसाज केल्यास केसातील कोंडा कमी होतो व केसांना चमक येतो.