BEAUTY : या पाच वस्तूंनी घरीच करा ब्लीच !
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2017 17:50 IST2017-02-01T12:20:01+5:302017-02-01T17:50:01+5:30
मुली आपल्या चेहऱ्याचे सौंदर्य वाढविण्यासाठी कित्येक प्रकारच्या ब्युटी प्रॉडक्ट्सचा वापर करतात, जसे की ब्लीच.

BEAUTY : या पाच वस्तूंनी घरीच करा ब्लीच !
मुली आपल्या चेहऱ्याचे सौंदर्य वाढविण्यासाठी कित्येक प्रकारच्या ब्युटी प्रॉडक्ट्सचा वापर करतात, जसे की ब्लीच. ब्लीच केल्याने बऱ्याचदा त्वचेवर रॅशेस पडतात. हेच नव्हे तर कित्येकदा खाजदेखील येते. अशावेळी घरगुती वस्तूंचा वापर करुन चेहऱ्याचे सौंदर्य टिकविणे अधिक चांगले. आज आम्ही आपणास असे काही नैसर्गिक वस्तूंच्या बाबतीत माहिती देत आहोत ज्याद्वारे आपण ब्लीच तयार करु शकता.
१. संत्री
संत्र्यामधील तत्वे त्वचेसाठी खूपच फायदेशीर असतात. यातील सायट्रिक अॅसिड ब्लीचचे काम करते. यासाठी संत्र्याच्या रसात थोडी हळद मिक्स करुन पॅक तयार करा. हा पॅक चेहऱ्यावर लावा आणि कोरडा झाल्यानंतर धुवा. रोज हा पॅक वापरा आणि सौंदर्य वाढवा.
२. काकडी
काकडी चेहऱ्याची कांती उजाळते. लिंबूचा रस आणि काकडीचा रस एकत्र करुन चेहऱ्यावर लावा. यामुळे चेहऱ्याची चमक वाढण्यास मदत होते.
३. दही
दहीमध्ये लॅक्टिक अॅसिड असते जे ब्लीचचे काम करते. दहीला चेहऱ्यावर रगडा आणि थोड्या वेळासाठी तसेच राहू द्या. काही आठवडे असे केल्याने चेहऱ्याची चमक वाढते.
४. पपई
कच्च्या पपईला लिंबूसोबत मिक्स करून चेहऱ्यावर लावा. नंतर हळूहळू मसाज करा. थोड्या वेळानंतर पाण्याने धुवा. आठवड्यात एकदा हा पॅक लावा.
५. हळद
हळद लावल्याने चेहऱ्यावर ग्लो येतो. यासाठी हळदीला मधासोबत मिक्स करुन चेहऱ्यावर लावा. कोरडे झाल्यावर धुवा.
Also Read : पी हळद हो गोरी !
: घरगुती उपाय करा अन् स्किन उजाळा !