BEAUTY : चेहऱ्यावरील सुरकुत्या टाळण्यासाठी !
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2017 16:22 IST2017-01-31T10:51:31+5:302017-01-31T16:22:06+5:30
बऱ्याचदा चांगल्या दर्जाची उत्पादने वापरुनही चेहऱ्याचे सौंदर्य टिकत नाही. त्यातील सर्वात मोठी समस्या म्हणजे चेहऱ्यावर सुरकुत्या येणे होय. जसे वय वाढते तसे चेहऱ्यावरच्या सुरकुत्या अधिक स्पष्ट होत जातात.

BEAUTY : चेहऱ्यावरील सुरकुत्या टाळण्यासाठी !
प्रत्येकाला आपण सुंदर दिसावे असे वाटते. त्यासाठी तरुण-तरुणींबरोबरच सर्वजण वेगवेगळे सौंदर्य प्रसाधने वापरतात. बऱ्याचदा चांगल्या दर्जाची उत्पादने वापरुनही चेहऱ्याचे सौंदर्य टिकत नाही. त्यातील सर्वात मोठी समस्या म्हणजे चेहऱ्यावर सुरकुत्या येणे होय. जसे वय वाढते तसे चेहऱ्यावरच्या सुरकुत्या अधिक स्पष्ट होत जातात. ही अवस्था जरी कुणाला आवडत नसेल तरी प्रत्येकालाच याचा सामना करावा लागतो. मात्र योग्य वेळी काही उपाययोजना केली तर या समस्येपासून काही प्रमाणात समाधान मिळू शकते. बारीक रेषा व सुरकुत्या चेहऱ्यावर येऊ लागल्या तर त्याकडे मुळीच दुर्लक्ष करु नका. या समस्येला जरी थांबविणे शक्य नाही मात्र याचा वेग मात्र कमी केला जाऊ शकतो.
काय उपाययोजना कराल
* केसांच्या दिशेने शेव्ह करा - लोक नेहमी ही मोठी चूक करतात. त्वचेला लवकर स्वच्छ करण्याच्या नादात ब्लेड उलटी चालवतात. परंतु हे चुकीचे आहे. यामुळे कट लागणे व जळजळ होण्याची भीती असते.
* तेलकट खाणे टाळा - तेलाचे सेवन जितके कमी करता येईल तितके कमी करा. जेवणात क्रेनबेरी व बदाम यांचा समावेश करा.
* स्मोकिंग सोडा - स्मोकिंगमुळे तुमचे आयुष्य कमी होते. सिगारेट किंवा कुठल्याही प्रकारचे व्यसन त्वचेतील पेशींची निर्मिती थांबवते.
* अॅक्टिव्ह लाईफस्टाईल - पूर्ण झोप घ्या. व्यायाम व ध्यान करा. शरीर स्वस्थ ठेवा
* चेहऱ्याचा व्यायाम- रोज सकाळी किमान १० ते १५ मिनिट चेहऱ्याचा व्यायाम करा.
Also Read : घरगुती उपाय करा अन् स्किन उजाळा !
: पी हळद हो गोरी !