शाम्पूमध्ये कॉफी टाकून केस धुतल्यास काय होतं? कॅनडाच्या डॉक्टरांनी केला 'हा' दावा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2025 12:02 IST2025-02-24T12:01:19+5:302025-02-24T12:02:04+5:30
Hair Gowth Tips : केसगळती रोखण्यासाठी आणि केसांची वाढ करण्यासाठी बाजारात वेगवेगळे प्रोडक्ट्स मिळतात. पण त्यातील परफेक्ट प्रोडक्ट निवडणं फारच कन्फ्यूजिंग काम असतं.

शाम्पूमध्ये कॉफी टाकून केस धुतल्यास काय होतं? कॅनडाच्या डॉक्टरांनी केला 'हा' दावा!
Hair Gowth Tips : केसगळती, टक्कल आणि केस न वाढण्याची समस्या आजकाल कॉमन झाली आहे. अनेक लोक कमी वयातच टक्कल पडल्यामुळे चिंतेत आहेत. केसगळती रोखण्यासाठी आणि केसांची वाढ करण्यासाठी बाजारात वेगवेगळे प्रोडक्ट्स मिळतात. पण त्यातील परफेक्ट प्रोडक्ट निवडणं फारच कन्फ्यूजिंग काम असतं. अशात कॅनडातील डॉक्टर जानिन बाउरिंग यांनी केस उगवण्यासाठी, त्यांची वाढ होण्यासाठी एक सोपा उपाय सांगितला आहे.
डॉक्टर बाउरिंग यांनी टिकटॉकवर याबाबत माहिती दिली. ते म्हणाले की, डोक्यावर कमी केस असण्याच्या कारणांपैकी एक कारण म्हणजे एंड्रोजेनेटिक एलोपेसिया (AGA). याला पुरूषांमध्ये मेल पॅटर्न बाल्डनेस आणि महिलांमध्ये वुमन पॅटर्न बाल्डनेस नावानं ओळखलं जातं. ते म्हणाले की, ही समस्या सामान्यपणे पुरूषांमध्ये टेंपल एरियामध्ये सुरू होते आणि काळानुसार, 'M' शेपमध्ये कमी होऊ लागतात तर महिलांमध्ये ही समस्या समोरून होते. जिथे केसांमध्ये गॅप दिसू लागतो.
शाम्पूसोबत मिक्स करून लावा ही गोष्टी
डॉक्टर बाउरिंग यांनी सांगितलं की, कॅफीनमुळे केस वाढण्यास मदत मिळते, अनेक रिसर्चमधून हे सिद्ध झालं आहे. त्यांच्यानुसार केसांचं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी शाम्पूमध्ये एक चमचा बारीक केलेली कॉफी मिक्स करा आणि यानं केस धुवा. या उपायानं केस आणखी डार्क होतील.
कसा कराल वापर
डॉक्टर बाउरिंग यांच्यानुसार, कॉफी शाम्पूमध्ये मिक्स करण्याची प्रक्रिया सोपी आहे. तुम्ही शाम्पू हातावर घेऊन त्यात कॉफी पावडर मिक्स करा आणि मग केसांना लावा. त्यानंतर केस धुवून घ्या.