थंडीत केसांसाठी या गोष्टी टाळा !

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2017 15:48 IST2017-01-11T15:48:14+5:302017-01-11T15:48:14+5:30

आपल्या सौंदर्यात भर घालण्यासाठी केसांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. दाट व मजबूत केसांमुळे सौंदर्याबरोबरच आपले व्यक्तिमत्त्वदेखील रुबाबदार दिसते. तशी केसांची काळजी ही ऋतुमानानुसारच घ्यायला हवी.

Avoid these things for cold stays! | थंडीत केसांसाठी या गोष्टी टाळा !

थंडीत केसांसाठी या गोष्टी टाळा !

ong>-रवीन्द्र मोरे 

आपल्या सौंदर्यात भर घालण्यासाठी केसांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. दाट व मजबूत केसांमुळे सौंदर्याबरोबरच आपले व्यक्तिमत्त्वदेखील रुबाबदार दिसते. तशी केसांची काळजी ही ऋतुमानानुसारच घ्यायला हवी. विशेषत: हिवाळ्यात चुकीच्या गोष्टींचा वापर केल्याने केस गळतीच्या प्रमाणात अधिक वाढ होते. मात्र, काही गोष्टी टाळल्यास केसांचे गळणे कमी होण्यास मदत होऊ शकते. 

घाईत कंडिशनरचा वापर टाळा
थंडीत बहुतेक जण अंघोळ घाई-घाईत उरकत असतात. त्यातच केस धुण्याचीही घाई केली जाते. केसांना शॅम्पू केल्यास ठीक आहे, मात्र कंडिशनर लावल्यावर केस स्वच्छ धुणे आवश्यक असते. अशावेळी घाई करुन केस स्वच्छ धुतले गेले नाही तर तर शॅम्पू व कंडिशनरचे केमिकल्स केसांना चिकटून राहून केस गळायला लागतात. 

ओले केस बांधणे टाळा
बहुतेक महिलांना केस धुतल्यानंतर टॉवेलने बांधण्याची सवय असते. मात्र अशाने केसांमध्ये कोंडा होण्याची समस्या निर्माण होते. यामुळे केस गळतीस सुरुवात होते. 

केसांना तेल लावून झोपणे टाळा
केसांना तेल लावून ठेवल्याने ते अधिक मजबूत होतात, असा बहुतेकजणांचा समज आहे. मात्र, रात्रभर केसांना तेल लावून ठेवल्याने केसांचे मूळ कमकुवत होऊन ते गळायला लागतात. केस धुवायच्या १ किंवा २ तास आधी तेल लावावे. 

ड्रायर वापरणे टाळा
थंडीच्या दिवसांत ओले केस सुकवण्यासाठी फक्त महिलाच नव्हे तर पुरुषही ड्रायर वापरतात. तुम्हीही असे करत असल्यास ते घातक ठरू शकते. केसांना गरजेपेक्षा जास्त गरम करणे केस गळण्याचे कारण बनू शकते. 

Web Title: Avoid these things for cold stays!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.