कॅलरीपेक्षा पदार्थांच्या गुणवत्तेकडे लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2016 08:29 IST2016-02-12T15:29:29+5:302016-02-12T08:29:29+5:30

वाढते वजन, लठ्ठपणा ही गंभीर जागतिक आरोग्य समस्या आहे. वजन कमी करण्यासाठी लोक कमी कॅलरीयुक्त आहार घेणे पसंत करतात.

Attention to the quality of materials than calories | कॅलरीपेक्षा पदार्थांच्या गुणवत्तेकडे लक्ष

कॅलरीपेक्षा पदार्थांच्या गुणवत्तेकडे लक्ष

ong>वाढते वजन, लठ्ठपणा ही गंभीर जागतिक आरोग्य समस्या आहे. वजन कमी करण्यासाठी लोक कमी कॅलरीयुक्त आहार घेणे पसंत करतात. पण, केवळ कमी कॅलरी खाण्यामुळे वजन कमी होत नाही. त्यासाठी गुणवत्तापुर्ण सकस आणि पौष्टिक आहाराची गरज असते असे एका सर्वेक्षणातून समोर आले.

‘ग्लोबल हेल्थी वेट रेजस्ट्रि’ (जीएचडब्ल्यूआर) नावाच्या संस्थेतेने आजीवन आपले वजन नियंत्रणात ठेवले अशा प्रौढांचा सर्वे करून सदर निष्कर्ष काढला.
अमेरिकेतील कॉर्नेल विद्यापीठाच्या ‘कॉर्नेल फुड अँड ब्रँड लॅब’तर्फे जीएचडब्ल्यूआर ही संस्था संगठित करण्यात आली आहे. यामध्ये सहभागी झालेल्या स्वयंसेवकांनी त्यांचा आहार, व्यायाम आणि दिनचर्येसंबंधी प्रश्नांची उत्तरे दिली. 

दोन गटांत या स्वयंसेवकांची विभागणी करण्यात आली. एका गटात अतिसडपातळ असे 112 लोक होते ज्यांनी कधीच डाएट पाळला नाही. दुसºया गटात डाएटचे कठोरपणे पालन करणारे, आपण काय खातो याविषयी अधिक जागरुक होते.

दोन्ही गटांचा अभ्यास केला असता असे दिसून आले की, पारंपरिकरीत्या वजन कमी करण्यासाठी ज्या सूचना किंवा डाएट प्लॅन सांगितला जातो त्याहून वेगळी अशी स्ट्रॅटेजी पहिला गटातील लोक वापरतात.

Web Title: Attention to the quality of materials than calories

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.