अनंत अंबानीचा ‘भीमपराक्रम’!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2016 21:40 IST2016-04-13T04:37:56+5:302016-04-12T21:40:57+5:30

केवळ 18 महिन्यांत अनंत अंबानीने तब्बल 108 किलो वजन कमी केले आहे. 

Anant Ambani's 'Bhimapramkram'! | अनंत अंबानीचा ‘भीमपराक्रम’!

अनंत अंबानीचा ‘भीमपराक्रम’!

भारतातील सर्वांत श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांचे धाकटे चिरंजीव अनंत सध्या सर्व सेलिब्रेटींच्या कौतुकाचा विषय बनले आहेत. सलमानपासून ते धोनीपर्यंत सर्वच जण त्याची प्रशंसा करत आहे. असं काय केलंय या पठ्ठ्याने?

केवळ 18 महिन्यांत अनंत अंबानीने तब्बल 108 किलो वजन कमी केले आहे.

अबब...! 108 किलो वजन घटवले? हो!

त्याने गेली दीड वर्षे कठोर मेहनत घेऊन 108 किलो वजन कमी केले आणि तेदेखील सर्जरी किंवा औषध-गोळ्यांनी नाही तर संपूर्णत: नैसर्गिक पद्धतीने.

गोष्ट तशी फार जुनी नाही. मागच्या वर्षी ‘आयपीएल’ सामन्यांदरम्यान तुम्ही अनंतला ‘मुंबई इंडियन्स’ला चिअर अप करताना पाहिलेच असेल. तेव्हाचा अनंत आठवा आणि आताचा ‘वेटलॉस’ केलेला अनंत पाहिल्यावर तुम्हाला कल्पना येईल की, खरंच तो कौतुकास पात्र आहे.

लहानपणी अनंतला ‘क्रोनिक अस्थमा’चा त्रास होता. त्यावर उपचार म्हणून देण्यात आलेल्या औषधांमुळे त्याचे वजन प्रमाणाबाहेर वाढले. डॉक्टरांनी त्याला नैसर्गिक मार्गाने वजन घटविणे फार अवघड असल्याचे सांगितले होते. परंतु २१ व्या वाढदिवसापूर्वी ‘फिट’ होण्याचा त्याने प्रणच केला होता.

Nita Anant

दुर्दम्य इच्छाशक्तीच्या बळावर अनंतने अशक्यप्राय वाटणारी गोष्टी शक्य करून दाखवली. त्याची आई नीता अंबानी तर मुलाने दाखवलेल्या चिकाटीचा गर्व वाटत आहे.

वजन घटवू इच्छिणाऱ्या प्रत्येकासाठी प्रेरणा बनलेल्या अनंतचा कठोर डाएट आणि व्यायामाचे रुटिन पुढील प्रमाणे होते.

1. 21 किमी चालणे

सर्वात पहिले अनंतने काय केले असेल तर ते रोजच्या रोज 21 किमी चालणे. रोज अर्ध-मॅरेथॉनमध्ये सहभागी होण्यासारखे आहे ते. लठ्ठपणा व कमी स्टॅमिना/सहनशक्ती असलेल्या लोकांसाठी पायी चालण्यासारखा दुसरा व्यायाम नाही.

2. योगा

प्राचीन भारतापासून चालत आलेल्या ‘योगा’चे महत्त्व तर सर्व जग जाणते. अनंतनेसुद्धा वजन घटविण्यासाठी योगाची मदत घेतली. मन आणि शरीराला एका दिशेत घेऊन जाण्याचे काम योगा करते.

3. वेट ट्रेनिंग

वजन घटविण्यासाठी शरीरातील कॅलरीज (उष्मांक) नष्ट करणे खूप गरजेचे असते. कॅलरीज् बर्न करण्याचा सर्वाेत्तम उपाय म्हणजे वेट ट्रेनिंग.

4. फंक्शनल ट्रेनिंग

शरीरातील मसल्सना एकत्र काम करून बॅलन्स साधण्याचे प्रशिक्षण फंक्शनल ट्रेनिंगमध्ये देण्यात येते. लंजेस्, उठाबशा, स्ट्रेचेस् अशा प्रकारचे व्यायाम यामध्ये करण्यात येतात.

5. हाय-इंटेन्सिटी कार्डियो

कोणताही जिम ट्रेनर तुम्हाला हाय-इंटेन्सिटी कार्डियो व्यायामाचे महत्त्व सांगू शकेल. यामध्ये हृदयाच्या ठोक्याचा वेग वाढवून कमी काळात जास्त कॅलरीज् जाळण्यात येतात. दरम्यान छोट्या छोट्या कालांतराने ब्रेक घेतला जातो.

6. आहार (डाएट)

वजन घटवायचे असेल तर हेल्दी डाएट घेण्याशिवाय पर्याय नाही. गेल्या दीड वर्षांपासून अनंतने साखरेचा एकही कण खाल्लेला नाही. त्याच्या डाएटमध्ये कमी कार्बोदके  (लो-कार्ब) , प्रोटीन, हेल्दी फॅटचा सामावेश होता.

ट्विटरवर होणारा कौतुकाचा वर्षाव :
{{{{twitter_post_id####}}}}

{{{{twitter_post_id####}}}}

Web Title: Anant Ambani's 'Bhimapramkram'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.