Alum Water Steam : चेहऱ्यावर गरम पाण्याची वाफ घेणं त्वचेसाठी खूप फायदेशीर मानलं जातं. वाफ घेतल्यानं त्वचेच्या रोमछिद्रांमध्ये जमा धूळ-माती निघून जाते आणि त्वचा टाइट होते. ज्यामुळे चेहऱ्याची चमकही वाढते. वाफ घेतल्यानं पिंपल्स आणि अॅक्नेही हलके पडतात. तेच जर तुम्ही पाण्यात एक तुकडा तुरटी टाकून वाफ घेतली तर यातील नॅचरल अॅंटी-बॅक्टेरिअल आणि अॅंटी-फंगल गुण त्वचेच्या अनेक समस्या दूर करण्यास मदत करतात. अशात तुरटीच्या पाण्याची वाफ घेतल्याव त्वचेला काय काय फायदे मिळतात हे जाणून घेऊ.
तुरटीच्या पाण्याची वाफ घेण्याचे फायदे
एक्स्ट्रा ऑइल निघून जातं
तुरटीच्या पाण्यानं वाफ घेतल्यास त्वचेची रोमछिद्रे उघडतात, ज्यामुळे चेहऱ्यावर जमा झालेला मळ आणि ऑइल निघून जातं. ज्यामुळे पिंपल्स आणि अॅक्नेची समस्या कमी होते.
ब्लॅकहेड्स आणि व्हाईटहेड्स कमी होतात
तुरटी टाकलेल्या पाण्यानं वाफ घेतल्यास त्वचेवरील बॅक्टेरिअल आणि फंगल इन्फेक्शन दूर होतं. त्याशिवाय चेहऱ्यावरील ब्लॅकहेड्स आणि व्हाईटहेड्सही कमी होतात.
त्वचेचा रंग उजळतो
तुरटीच्या पाण्यानं वाफ घेतल्यास त्वचेचा रंग उजळण्यास मदत मिळते. ज्यामुळे टॅनिंग कमी होते आणि त्वचेची चमक वाढते.
चेहरा फ्रेश दिसतो
जर त्वचा फारच थकलेली दिसत असेल तर तुम्ही तुरटीच्या पाण्यानं वाफ घेऊ शकता. यानं त्वचा फ्रेश दिसेल.
कसा कराल वापर?
हे पाणी तयार करण्यासाठी एका भांड्यात पाणी टाकून तुरटीचा एक तुकडा टाका. हे पाणी चांगलं उकडू द्या. नंतर १० ते १५ मिनिटं या पाण्यानं वाफ घ्या. त्यानंतर चेहरा साध्या पाण्यानं धुवून घ्या आणि मॉइश्चरायजर लावा.