Alert : हेअरस्टाइल करताना ‘या’ चुका केल्यास गळतील केस !
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2018 12:03 IST2017-10-10T11:47:57+5:302018-06-23T12:03:31+5:30
आम्ही आपणास काही टिप्स देत असून त्या फॉलो केल्यास आकर्षक हेअरस्टाइल करु शकाल शिवाय केस गळतीही होणार नाही. जाणून घेऊया त्या चुकांबाबत...
.jpg)
Alert : हेअरस्टाइल करताना ‘या’ चुका केल्यास गळतील केस !
आ ण आपल्या आवडत्या नायिकेसारखे आकर्षक दिसावे, त्यांच्यासारखी आपलीही आकर्षक हेअरस्टाइल असावी, असे बहुतांश तरुणींना वाटते. विशेष म्हणजे त्यांचे अनुकरणही केले जाते आणि वेगवेगळ्या पद्धतीच्या हेअरस्टाइल तरुणी अप्लाय करण्याचा प्रयत्न करतात, मात्र हेअरस्टाइलच्या योग्य पद्धती आपणास माहित नसतात, शिवाय आपणाकडून अशा काही चुका होतात की, ज्यामुळे केस गळतीस सुरुवात होते. आम्ही आपणास काही टिप्स देत असून त्या फॉलो केल्यास आकर्षक हेअरस्टाइल करु शकाल शिवाय केस गळतीही होणार नाही. जाणून घेऊया त्या चुकांबाबत...
* बऱ्याचदा हेअरस्टाइल करताना हेव्ही हेअर एक्सटेन्शन्स वापरले जाते. यामुळे डोके जड झाल्यासारखे वाटते. डोक्यावर, केसांवर वजन येते व त्यामुळे केस गळू लागतात. तसंच ६-८ आठवड्यांसाठी एक्सटेन्शन्स हलके असले तरी वापरू नका. कारण त्यामुळे केस तुटू लागतील. हलके एक्सटेन्शन्स वापरा पण जास्त वेळासाठी ते केसांवर ठेऊ नका. त्यामुळे केसांचे नुकसान होण्याची शक्यता अधिक असते.
* इलॅस्टिक रबरबँडने पोनी बांधल्यास केस अगदी सहज तुटतात. रबर काढताना केस तुटू लागतात. म्हणून इलॅस्टिकऐवजी कपड्याचे रबरबँड वापरा. ते केसांतून सहज निघतात व त्यामुळे केस देखील तुटत नाहीत.
* काहीजणांना प्रत्येक वेळी बाहेर किंवा पार्टीला जाताना केस ब्लो ड्राय करण्याची सवय असते. केस कर्ल किंवा स्ट्रेट करण्यासाठी स्ट्रेटनेर, आयनिंग मशीन नियमित वापरल्याने केसांचे स्वरूप बिघडते व केस तुटू लागतात. म्हणून केस जितक्या नैसर्गिक स्थितीत ठेवता येतील तितके अधिक चांगले. तसंच गरज असल्यास या साधनांचा वापर केल्यानंतर केसांना तेलाने मालिश करा. त्यामुळे केस खराब होणार नाहीत.
* बहुतांशजण ओले केस सुकवण्यासाठी ब्लो ड्राय करतात, मात्र त्या उष्णतेमुळे केस खराब होऊ शकतात. तसंच केसांचे नुकसान टाळण्यासाठी ओल्या केसांची कोणतीही स्टाईल करू नका.
Also Read : Beauty : केस गळती आणि पांढऱ्या केसांच्या समस्येवर हा आहे खास पॅक !