अल्कोहोल करते कोलेस्टेरॉल कमी? खरंच?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2016 15:56 IST2016-04-12T22:55:32+5:302016-04-12T15:56:29+5:30

अल्कोहोलमुळे रक्तवाहिन्यांत जमा होणारे कोलेस्टेरॉल कमी होते.

Alcoholic Cholesterol Reduction? Really? | अल्कोहोल करते कोलेस्टेरॉल कमी? खरंच?

अल्कोहोल करते कोलेस्टेरॉल कमी? खरंच?

लकट, मेदयुक्त अन्नपदार्थ चवीने अतिशय स्वादिष्ट असतात; मात्र आपल्या आरोग्यासाठी आणि विशेषकरून हृदयासाठी खूप हानीकारक असतात हे तर आपण जाणातो.

अशा पदार्थांमुळे रक्तवाहिन्यांमध्ये कोलेस्टेरॉल जमा होऊन रक्तप्रवाहाला अडथळा (ब्लॉकेज) निर्माण होतो. जे की, हृदयविकाराला आमंत्रण देणारे ठरते.

आता दारुचे दुष्परिणामदेखील सर्वश्रुत आहेत. यकृत (लिव्हर) आणि अल्कोहोल म्हणजे घातक मिश्रण आहे. पण आतापर्यंत आपल्याला हे माहित नव्हते की, अल्कोहोलमुळे रक्तवाहिन्यांत जमा होणारे कोलेस्टेरॉल कमी होते. वाचून आश्चर्य वाटले ना!

अमेरिकेतील एका संशोधनामध्ये असे दिसून आले की, अल्कोहोलमध्ये असलेले ‘बिटा-साक्लोडेक्स्ट्रिन’ नावाचे संयुग वाहिन्यांत जमा होणारे कोलेस्टेरॉल सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या औषधांपेक्षा अधिक परिणामकारकरित्या कमी करते. उंदरावर करण्यात आलेल्या प्रयोगातून असा निष्कर्ष काढण्यात आला.

अमेरिकेच्या अन्न व औषध खात्याने ‘बिटा-साक्लोडेक्सिट्रिन’च्या वापराला परवानगी दिली आहे. आता तळीरामांना ‘चिअर्स’ म्हणण्याचा आणखी एक बहाणाच मिळाला.

Web Title: Alcoholic Cholesterol Reduction? Really?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.