दारू-सिगारेट नव्हे रोजच्या जेवणामुळे मृत्यू!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2016 13:46 IST2016-01-16T01:20:25+5:302016-02-07T13:46:44+5:30
व्यसनांपासून दूर राहिले पाहिजे असे नेहमी आपल्याला सांगितले जाते. दारू-सिगारेटचे दूष्परिणाम आपण सर्व...

दारू-सिगारेट नव्हे रोजच्या जेवणामुळे मृत्यू!
व यसनांपासून दूर राहिले पाहिजे असे नेहमी आपल्याला सांगितले जाते. दारू-सिगारेटचे दूष्परिणाम आपण सर्वजण जाणतो; परंतु एका नव्या संशोधनातून धक्कादायक बाब समोर आली आहे. जगामध्ये सर्वात जास्त मृत्यू होण्याला कोणते व्यसन नाही तर आपण खात असलेले अन्न कारणीभूत आहे. अयोग्य अन्नपदार्थांच्या सेवनामुळे हृदयविकार, स्ट्रोक, मधुमेहासारख्या जेवघेण्या आजारांचा धोका वाढतो आणि पर्यायाने मृत्यूचे प्रमाणदेखील वाढते. अमेरिकेच्या इन्स्टीट्यूट फॉर हेल्थ मेट्रिक्स अँड इवॅल्यूएशन (आयएचएमई)तर्फे हे अध्ययन करण्यात आले. 'आयएचएमई'चे संचालक डॉ. ख्रिस्तोफर र्मुे यांनी सांगितले की, 'अयोग्य आहार आणि व्यसन टाळून आपण मृत्यूचा धोका बर्याच प्रमाणात कमी करू शकतो. भाज्या, फळे, धान्याचे अपूरे सेवन आणि लाल मांस, मीठ, साखरेचे अतिसेवन करू नये. आरोग्याला पोषक असा आहार रोज ठेवला तर निरोगी आयुष्याचे वरदान सर्वांनाच लाभते.' विशेष म्हणजे सर्वात अधिक मृत्यूस जबाबदार टॉप १0 गोष्टींमध्ये सिगारेट पाचव्या तर दारू नवव्या क्रमांकावर आहे.