चित्रपटांच्या कमाईत अक्षय कुमार टॉपवर
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2016 20:19 IST2016-06-25T14:49:47+5:302016-06-25T20:19:47+5:30
बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार नुकतेच एका चित्रपटासाठी करोडो रुपये मानधन घेण्यावरुन सध्या चर्चेत आहे.
.jpg)
चित्रपटांच्या कमाईत अक्षय कुमार टॉपवर
ब लिवूड अभिनेता अक्षय कुमार नुकतेच एका चित्रपटासाठी करोडो रुपये मानधन घेण्यावरुन सध्या चर्चेत आहे. अक्षय कुमार कोणत्याही मोठ्या कलाकारांच्या पुढेच दिसत आहे. भलेही सलमान, आमिर आणि शाहरुख चित्रपटाच्या नफ्यातील वाट्यात खूप कमवत असतील, मात्र मानधन आणि साइन करण्याअगोदर देण्यात येणाºया रकमेच्या बाबतीत अक्षय सर्वांपेक्षा महागडा स्टार आहे.
आता नुकताच अक्षयने ‘जॉली एलएलबी’ ४२ करोड रुपयात साइन केला आहे. या चित्रपटासाठी अक्षयला केवळ ४२ दिवसच शूटिंग करायची आहे. म्हणजेच एका दिवसासाठी एक करोड रुपये. याच दरम्यान एक बातमी अशी मिळाली आहे की, अक्षय कुमार ने अजून एक चित्रपट साइन केला आहे, ज्याच्या बदल्यात त्याने ५६ करोड रुपये मागितले आणि ही रक्कम त्याला मिळलीदेखील आहे.
‘यारिया’ आणि ‘सनम रे’ सारख्या चित्रपटाचे निर्देशक दिव्या कुमार खोसला आपल्या आगामी चित्रपटात अक्षय कुमारला घेऊ इच्छित आहे. दिव्याचे मागील दोन्ही चित्रपट यशस्वी झालेत, मात्र हे यश विविध राइट्सच्या माध्यमातून मिळाले होते. तरीही हे यश फार मोठे नव्हते. याचाच विचार क रुन अक्षयने मोठ्या रकमेची मागणी केली आणि सूत्रानुसार त्याला ही रक्कम मिळाली. मात्र अक्षयने या गोष्टीला दुजोरा दिलेला नाही.