शहरं
Join us  
Trending Stories
1
आता औरंगाबाद नाही, तर छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्टेशन; केंद्राकडून नोटिफिकेशन जारी...
2
Video: पाईपने स्वच्छ पाणी आणले, पीएम मोदींसाठी तयार केली खोटी यमुना; 'AAP' चा मोठा दावा
3
“ही आत्महत्या नाही, तर संस्थात्मक हत्या आहे,” सातारा प्रकरणावर राहुल गांधींचा संताप...
4
"तो आनंदी होता, आम्ही ४० मिनिटं व्हिडीओ कॉलवर बोलला..."; लेकाच्या मृत्यूने वडिलांना धक्का
5
विमानातून उतरताच ट्रम्प यांनी धरला ठेका, ठुमके पाहून मलेशियाचे पंतप्रधानही चकित झाले; बघा Video
6
सीमेवर ‘ऑपरेशन त्रिशूल’ची तयारी; पाकिस्तानी सैन्यात खळबळ, लष्करी सरावामुळे झोप उडाली
7
Gopal Badane : "मला निष्कारण अडकवलं जातंय"; निलंबित पीएसआय गोपाळ बदनेची पहिली प्रतिक्रिया
8
Video: मोठी झाल्यावर काय बनू इच्छिते? धोनीच्या 10 वर्षीय मुलीने दिले 'हे' उत्तर, तुम्हीही कराल कौतुक
9
नोकरीनंतर फिक्स उत्पन्न हवे? पोस्ट ऑफिसची 'ही' योजना देईल दरमहा ९००० रुपये; कोण करू शकतो गुंतवणूक?
10
बिहारमध्ये तेजस्वींचा मास्टरस्ट्रोक; पंचायत प्रतिनिधींना पेन्शन, ५० लाखांचा विमा, ५ लाखांची मदत अन्...! केली घोषणांची आतशबाजी
11
बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान 'दहशतवादी'...! पाकिस्तानची कारवाई, 'शाहबाज' सरकार बिथरलं; नेमकं काय घडलं?
12
'स्वत:चे घर घेणे' सर्वात वाईट निर्णय? 'भाड्याने राहा आणि कोट्यधीश व्हा'; बँकरने सांगितला फॉर्म्युला
13
किडनी फेल झाल्याने सतीश शाह यांचं निधन; 'या' गोष्टी कारणीभूत, 'ही' लक्षणं दिसताच व्हा सावध
14
'भारताने रशियन तेल आयात पूर्णपणे थांबवली', डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा केला दावा...
15
लेकीच्या लग्नासाठी बापाने जमवले ५ लाख; नवरीचा हार्ट अटॅकने मृत्यू, वरातीऐवजी निघाली अंत्ययात्रा
16
भुरटा नाही, अट्टल गुन्हेगार; ऑस्ट्रेलियन खेळाडूंची छेड काढणाऱ्या अकील खानची क्राइम कुंडली समोर
17
Video: शत्रुंजय टेकडीवर जंगलाच्या 'राजा'चा मुक्त वावर; सिंह दिसताच पर्यटक घाबरुन पळाले...
18
निवृत्तीनंतरही कर्ज मिळवणं सोपं! 'या' ३ महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा, बँक लगेच देईल लोन
19
अखेर तारीख जाहीर! 'या' दिवशी येणार Lenskart चा IPO; ₹7278 कोटी उभारण्याची योजना...
20
शौर्याची गाथा निळ्या समुद्राखाली विसावणार, INS गुलदारचे रुपांतर देशाच्या पहिल्या पाण्याखालील संग्रहालयात

काजळ लावल्यानंतर पसरत असेल तर उपयोगी ठरतील 'या' 5 टिप्स!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2018 16:51 IST

डोळ्यांचं सौंदर्य वाढवण्यासाठी तसेच डोळ्यांचं आरोग्य चांगलं राखण्यासाठीही काजळ वापरण्यात येतं. सध्या बाजारात वेगवेगळ्या ब्रँडचे आणि वेगवेगळ्या प्रकारचे काजळ उपलब्ध आहेत. प्रत्येक मुलीच्या मेकअप किटमध्ये काजळ हे असतचं.

डोळ्यांचं सौंदर्य वाढवण्यासाठी तसेच डोळ्यांचं आरोग्य चांगलं राखण्यासाठीही काजळ वापरण्यात येतं. सध्या बाजारात वेगवेगळ्या ब्रँडचे आणि वेगवेगळ्या प्रकारचे काजळ उपलब्ध आहेत. प्रत्येक मुलीच्या मेकअप किटमध्ये काजळ हे असतचं. जवळपास सर्वच मुली काजळ रोजच वापरतात. पण जवळपास सर्व मुली काजळाच्या एका गोष्टीनं वैतागलेल्या आहेत. ती गोष्ट म्हणजे, कितीही चांगल्या ब्रँडचं आणि महागडं काजळ घेतलं तरीदेखील ते काही तासांतच पसरतं. त्यामुळे डोळ्यांच्या आजूबाजूच्या स्कीनवर काळपटपणा दिसून येतो. जर तुम्हाला देखील हा त्रास सहन करावा लागत असेल तर जाणून घेऊयात काही टिप्स ज्यामुळे तुमचं काजळ पसरणार नाही... 1. सर्वातआधी तुम्ही तुमची काजळ लावण्याची पद्धत बदलणं गरजेचं आहे. तुम्ही काजळ आयलीडच्या आतल्या बाजूला लावत बाहेरच्या बाजूला येता. असं करण्यामुळे डोळ्यांच्या बाहेरच्या कोपऱ्यांवर काजळ जास्त लागतं आणि ते पसरण्यास सुरू होतं. पण जर तुम्ही काजळ बाहेरून आतल्या बाजूला लावलत तर मात्र ते व्यवस्थित लावलं जातं. 

2. जर शक्य असेल तर वॉटरफ्रुफ काजळाचा वापर करा. हे कजळ पसरत नाही.

3. काजळ पसरवायचं नसेल तर डोळ्यांच्या दोन्ही आयलीडच्या बाजूला थोडं कॉम्पॅक्ट पावडर लावा. असं केल्यानं काजळ पसरणार नाही.

4. काजळ लावण्याआधी डोळे स्वच्छ करा. डोळ्यांच्या आजूबाजूची त्वचा तेलकट झाल्यामुळे अनेकदा काजळ पसरतं.

5. काजळाऐवजी आयलायनर लावा. काजळापेक्षा आयलायनर व्यवस्थित लागतं आणि पसरतही नाही. यामुळे डोळ्यांना बोल्ड लूक येतो.

टॅग्स :Beauty Tipsब्यूटी टिप्सfashionफॅशन