हिवाळ्यातील खास घरगुती १० फेस पॅक !
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2017 14:58 IST
हिवाळ्यातील त्वचेच्या रुक्षपणामुळे आपल्या चेहऱ्याची चमक नाहिशी होते ज्यामुळे आपली त्वचा निस्तेज दिसायला लागते. मात्र, घरगुती काही उपाययोजना करुन खास फेस पॅक बनवून ते वापरल्यास आपल्या त्वचेची चकाकी पुन्हा नव्याने परत येऊ शकते.
हिवाळ्यातील खास घरगुती १० फेस पॅक !
-Ravindra Moreहिवाळ्यातील त्वचेच्या रुक्षपणामुळे आपल्या चेहऱ्याची चमक नाहिशी होते ज्यामुळे आपली त्वचा निस्तेज दिसायला लागते. मात्र, घरगुती काही उपाययोजना करुन खास फेस पॅक बनवून ते वापरल्यास आपल्या त्वचेची चकाकी पुन्हा नव्याने परत येऊ शकते. असे तयार करा घरगुती फेस पॅक* १०० गॅ्रम गहूचा कोंडा घ्या आणि एक कप पाण्यात रात्रभर भिजवून ठेवा. सकाळी चेहऱ्यावर चांगल्याप्रकारे लावून मसाज करा. यामुळे मृत स्कीनपासून सुटका तर मिळेल शिवाय त्वचेची चकाकी वाढण्यास मदत होईल. * धान्य, ज्वारीचे पीठ आणि मलाई समान मात्रेत मिक्स करुन पेस्ट तयार करा. या पेस्टला चेहऱ्यावर लावून कोरडे होऊ द्या. यामुळे मृतपेशी नष्ट होतात शिवाय चेहऱ्याची टोनिंग आणि मॉयश्चरायजिंगदेखील होते. * गरम पाण्यात काही बदाम भिजवा आणि त्यांची साल काढून घ्या. बदाम कोरडे झाल्यानंतर त्यांची पावडर बनवून ठेवा आणि रोज या पावडरमध्ये थोडथोडे दूध मिक्स करु न चेहऱ्यावर लावा. यामुळे ड्राय स्कीन आणि चेहऱ्यावरील डाग दूर होतील. * एक टेबलस्पून पीठात थोडे द्राक्ष चुरगळून मिक्स करा. या मिश्रणाला १५ मिनिटांपर्यंत चेहऱ्यावर लावा. नंतर कोमट पाण्याने चेहरा धुवा. असे केल्याने त्वचा मुलायम बनेल आणि सुरकुत्या त्याही पडत नाही.* चंदन पावडरमध्ये १-१ टेबलस्पून मिल्क पावडर, मध, लिंबूचा रस आणि बदामाचे तेल मिक्स करा. हा पॅक चेहऱ्यावर लावून कोरडा होऊ द्या. त्यानंतर धुवा. यामुळे आपला चेहरा ग्लो होण्यास मदत होईल. * एक टीस्पून तांदूळाचे पीठ घेऊन त्यात अर्धा टीस्पून मध मिक्स करा आणि चेहऱ्यावर लावा. अर्ध्या तासानंतर चेहरा धुवा. यामुळे त्वचेचा रुक्षपणा दूर होईल आणि सुरकुत्यादेखील पडणार नाहीत. * संत्र्याच्या साली उन्हात कोरडे करा आणि त्याची पावडर बनवा. त्यानंतर या पावडरमध्ये एक टीस्पून दूध, थोडी हळद आणि निंबूचा रस मिक्स करुन पेस्ट करा. या पेस्टला चेहऱ्यावर लावल्याने चकाकी वाढते. * मध, दही आणि दूध घेऊन मिक्स करा आणि चेहऱ्यावर लावा आणि २० मिनिटानंतर धुवा. यामुळे आपली त्वचा स्वस्थ आणि तरुण दिसायला लागेल. * मलईमध्ये चुटकीभर हळद पावडर आणि आॅलिव्ह आॅइलचे काही थेंब मिक्स करु न चेहऱ्यावर लावा. यामुळे त्वचेवर चककीतर येते शिवाय रक्षपणादेखील कमी होतो. * एक कप ताक, अर्धा एवोकैडोचा पल्प, दोन टेबलस्पून मध आणि थोडे आॅलिव्ह आॅईल घेऊन एकत्र मिक्स करा आणि चेहऱ्यावर लावा. हा पॅक चेहऱ्याला चांगल्याप्रकारे मॉयश्चराइजर करतो.