World Badminton Championships 2018 : भारतीयांची सकारात्मक सुरूवात, प्रणॉयची सलामी
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2018 12:14 IST2018-07-30T12:09:28+5:302018-07-30T12:14:46+5:30
जागतिक अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेत भारतीयांनी पहिल्या दिवशी सकारात्मक सुरूवात केली.

World Badminton Championships 2018 : भारतीयांची सकारात्मक सुरूवात, प्रणॉयची सलामी
नँजिंग (चीन) - जागतिक अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेत भारतीयांनी पहिल्या दिवशी सकारात्मक सुरूवात केली. पुरूष दुहेरीत मनू अत्री आणि बी सुमिथ रेड्डी यांनी भारताच्या विजयाचा श्रीगणेशः केला. त्यापाठोपाठ पुरूष एकेरीत एच एस प्रणॉयने विजयी सलामी दिली.
जागतिक क्रमवारीत 11व्या स्थानावर असलेल्या प्रणॉयला न्यूझीलंडच्या अभिनव मनोटाला नमवण्यासाठी फार कष्ट घ्यावे लागले नाही. त्याने अवघ्या 28 मिनिटांत 21-12, 21-11 अशा विजयासह आगेकूच केली.
TOTAL BWF World Championships 2018
— BWFScore (@BWFScore) July 30, 2018
MS - Round of 64
21 21 🇮🇳H. S. PRANNOY🏅
12 11 🇳🇿Abhinav MANOTA
🕗 in 28 minutes
https://t.co/cCdhn7RvFg
पुरूष दुहेरीत मनू अत्री आणि बी सुमिथ रेड्डी या जोडीने बल्गेरीयाच्या डॅनियल निकोलोव्ह आणि इव्हान रूसेव्हचा 21-13, 21-18 असा पराभव केला.
TOTAL BWF World Championships 2018
— BWFScore (@BWFScore) July 30, 2018
MD - Round of 64
🇮🇳Manu ATTRI🏅
21 21 🇮🇳B. Sumeeth REDDY🏅
13 18 🇧🇬Daniel NIKOLOV
🇧🇬Ivan RUSEV
🕗 in 26 minutes
https://t.co/K8ocypGO5I
महिला दुहेरीत संजोगिता घोरपडे आणि प्राजक्ता सावंत या भारतीय जोडीला पहिल्याच फेरीत गाशा गुंडाळावा लागला. तर्कीच्या बेंगीस इर्सेटीन आणि नॅझलिकॅन इंसी यांनी 22-20, 21-14 अशा फरकाने भारतीय जोडीला हार मानण्यास भाग पाडले.