शहरं
Join us  
Trending Stories
1
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
2
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
3
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
4
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
5
६ धावांत ४ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
6
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
7
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
8
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
9
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
10
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
11
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
12
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
13
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
14
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
15
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
16
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
17
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
18
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
19
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
20
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...

व्हिएतनाम ओपन बॅडमिंटन :सौरभ वर्माला अजिंक्यपद

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2019 4:26 AM

व्हिएतनाम ओपन बीडब्ल्यूएफ टूर सुपर १०० टूर्नामेंटच्या पुरुष एकेरीच्या अंतिम लढतीत चीनच्या सून फेई शियांगचा पराभव करीत जेतेपद पटकाविले.

हो ची मिन्ह सिटी : भारतीय बॅडमिंटनपटू सौरभ वर्माने रविवारी येथे व्हिएतनाम ओपन बीडब्ल्यूएफ टूर सुपर १०० टूर्नामेंटच्या पुरुष एकेरीच्या अंतिम लढतीत चीनच्या सून फेई शियांगचा पराभव करीत जेतेपद पटकाविले. दुसऱ्या मानांकित सौरभने ७५ हजार डॉलर पुरस्कार रक्कम असलेल्या स्पर्धेत एक तास १२ मिनिट रंगलेल्या अंतिम लढतीत २१-१२, १७-२१, २१-१४ ने सरशी साधली. सौरभने जेतेपद पटकाविण्याच्या प्रवासात जपानचा कोदाई नारोका, यू इगाराशी व मिनोरू कोगा यांचा पराभव केला.विद्यमान राष्ट्रीय चॅम्पियन सौरभने यंदा हैदराबाद ओपन व स्लोव्हेनियाई आंतरराष्ट्रीय स्पर्धेतही जेतेपद पटकाविले आहे.सौरभने पहिल्या गेममध्ये सुरुवातीपासून वर्चस्व गाजविताना ४-० अशी आघाडी घेतली. ब्रेकच्या वेळी तो ११-४ने आघाडीवर होता. ब्रेकनंतरही त्याने लय कायम राखत १५-४ असा स्कोअर केला. सूनने पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला; पण सौरभने पहिला गेम सहज जिंकला.दुसºया गेममध्ये सूनने शानदार खेळ केला आणि सुरुवातीलाच ८-० अशी आघाडी घेतली. ब्रेकच्या वेळी तो ११-५ ने आघाडीवर होता. ब्रेकनंतर सौरभ संघर्ष करीत असल्याचे दिसले. त्याचा लाभ घेत सूनने गेम जिंकत १-१ अशी बरोबरी साधली.निर्णायक गेमच्या सुुरुवातीला २६ वर्षीय सौरभ २-४ ने पिछाडीवर होता; पण ब्रेकपर्यंत त्याने ११-७ अशी आघाडी घेतली होती. चीनच्या खेळाडूने त्याला आव्हान दिले;पण भारतीय खेळाडूने आपलीआघाडी कायम राखली. १७-१४अशी आघाडी असताना सौरभनेसलग चार गुण वसूल करीतचीनच्या खेळाडूचे मनसुबे उधळून लावले. मध्य प्रदेशच्या याखेळाडूने गेल्या वर्षी डच ओपन व कोरिया ओपनमध्येही जेतेपद पटकाविले होते.सौरभ व सून यांच्यादरम्यान ही तिसरी लढत होती. सौरभने यापूर्वी कॅनडा व हैदराबादमध्ये जपानच्या या खेळाडूचा पराभव केला होता.जागतिक क्रमवारीत ३८ व्या स्थानावर असलेला सौरभ म्हणाला, ‘पहिल्या गेममध्ये मी त्याच्या कमकुवत रिटर्नची प्रतीक्षा करीत होतो. मला त्याचा बचाव कमकुवत वाटला व त्याचा लाभ घेतला.’>या आठवड्यातील माझ्या खेळावर समाधानी आहे. मी जपानच्या तीन खेळाडूंविरुद्ध विजय मिळविला. या खेळाडूंची खेळण्याची शैली जवळपास सारखी होती. कोर्टवर त्यांच्या खेळण्यात जो थोडा फरक होता त्यावर लक्ष द्यायचे होते. त्यांना पराभूत करण्यात यशस्वी ठरल्यामुळे आनंद झाला.- सौरभ वर्मा