Sindhu, Srikanth reach quarterfinals of China Open World Super Badminton Tournament | सिंधू, श्रीकांत चीन ओपन विश्व सुपर बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत
सिंधू, श्रीकांत चीन ओपन विश्व सुपर बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत


फुलाऊ :  माजी विजेते पी.व्ही. सिंधू आणि किदाम्बी श्रीकांत यांनी विपरीत परिस्थितीवर मात करीत गुरुवारी चीन ओपन विश्व सुपर बॅडमिंटन स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठली. 
आॅलिम्पिक रौप्य विजेत्या सिंधूने महिला एकेरीच्या दुसऱ्या फेरीत थायलंडची बुसानन ओंगबामरंगफान हिच्यावर २१-१२,२१-१५ ने सहज विजय नोंदविला. श्रीकांतने पुरुष एकेरीत तीन गेममध्ये रंगलेला थरार इंडोनेशियाच्या टॉमी सुगियार्तोविरुद्ध १०-२१,२१-९,२१-९ असा जिंकला. तिसरी मानांकित सिंधूला पुढील लढतीत आठवी मानांकित ही बिगजियाओ हिच्याविरुद्ध खेळायचे आहे. तिच्याकडून सिंधूला कडवे आव्हान मिळण्याची दाट शक्यता आहे. सिंधू याआधी बिगजियाओ हिच्याकडून दोन्ही सामन्यात पराभूत झाली होती. त्यामुळे उद्या पराभवाची परतफेड करण्याची संधी असेल. सिंधूने २०१६ मध्ये येथे जेतेपद पटकविले होते.


Web Title: Sindhu, Srikanth reach quarterfinals of China Open World Super Badminton Tournament
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.