शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
4
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
5
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
6
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
7
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
8
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
9
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
10
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
11
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
12
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
13
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
14
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
16
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
17
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
18
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
19
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
20
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप

चुरशीच्या लढतीत सिंधूचा पराभव, जपानच्या यामागुचीनं कोरलं दुबई ओपन बॅडमिंटन चषकावर नाव

By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2017 5:16 PM

दुबई ओपन सुपर सिरिज बॅडमिंटन स्पर्धेतच्या आंतिम सामन्यात भारताच्या पी.व्ही सिंधूला पराभवाला सामोर जावं लागलं आहे. अंतिम सामन्यात जपानच्या अकाने यामागुचीनं सिंधूचा सरळ तीन सेटमध्ये 1-2 अशा फरकानं पराभव केला.

दुबई - दुबई ओपन सुपर सिरिज बॅडमिंटन स्पर्धेतच्या आंतिम सामन्यात भारताच्या पी.व्ही सिंधूला पराभवाला सामोर जावं लागलं आहे. अंतिम सामन्यात जपानच्या अकाने यामागुचीनं सिंधूचा सरळ तीन सेटमध्ये 1-2 अशा फरकानं पराभव केला.  पहिला सेट जिंकल्यानंतर  दुसऱ्या आणि तिसऱ्या सेटमध्ये यामागुचीच्या आक्रमक खेळीपुढे सिंधूचा पराभव झाला. यामागुचीनं 21-15, 12-21, 21-19 असा सिंधूचा पराभव करत चषकावर नाव कोरलं. पहिल्याच गेममध्ये 5-9 अशी पिछाडीवर असलेल्या सिंधूने सामन्यात पुनरागमन करत अकाने यामागुचीवर 21-15, 21-21 असा दणदणीत विजय मिळवला. दुबईच्या शेख हमदान इंडोर स्टेडियममध्ये जवळपास दीड तास हा सामना रंगला.  पहिला गेम सहजपणे बाजी मारलेल्या सिंधूला दुस-या गेममध्ये यामागुचीकडून कडवी झुंज मिळाली. यावेळी यामागुचीनं जोरदार पुनरागमन करत सिंधूला चांगलच झुंजवलं. दुसऱ्या सेटमध्ये सिंधू 16-11 अशी पिछाडीवर पडली. दुसऱ्या सेटमधील यामागुचीच्या आक्रमक खेळीपुढे सिंधूनं हा सेट 21-12 अशा फरकानं गमावला. दुसऱ्या सेटमध्ये सिंधूनं काही चुका केल्या. यामागुचीच्या नेटवरील जबरदस्त खेळापुढे सिंधूने नियंत्रण गमावले. एकवेळ सिंधूने 7-7अशी बरोबरी साधत सामन्यात रंग भरले खरे, परंतु यानंतर यामागुचीने 10-13 अशी आघाडी घेत अखेरपर्यंत आपले वर्चस्व राखले. तिसऱ्या आणि निर्णायक सेटमध्ये सिंधूने आक्रमक सुरुवात करत केली. एकवेळ सिंधू 4-0 अशी आघाडी घेतली होती. पण निर्णायक क्षणी यामागुचीनं निर्णायक आणि आक्रमक फटकेबजी करत सिंधूचा पराभव केला.  यामागुचीच्या नेटवरील जबरदस्त खेळापुढे सिंधूने नियंत्रण गमावले. तिसरा सेट आतिशय रोमांचक पद्धतीनं झाला. 4-0, 5-5, 10-8, 13-12, 16-17, 17-17, 19-19 अशा रोमांचक पद्धतीत तिसरा सेट झाला. यामागुची आणि सिंधूनं प्रेक्षकांची मने जिंकली. 

टॅग्स :BadmintonBadminton