शहरं
Join us  
Trending Stories
1
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
3
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
4
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
5
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
6
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
7
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
8
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
9
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
10
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
11
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
12
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
13
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
14
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
15
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
16
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
17
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
18
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
19
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
20
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
Daily Top 2Weekly Top 5

श्रीकांत, सौरभ यांची उपांत्यपूर्व फेरीत धडक

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2019 04:19 IST

माजी विजेता किदाम्बी श्रीकांत व सौरभ वर्मा यांनी गुरुवारी येथे सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. त्याचवेळी युवा खेळाडू लक्ष्य सेनला पराभवाचा धक्का बसला.

लखनौ : माजी विजेता किदाम्बी श्रीकांत व सौरभ वर्मा यांनी गुरुवारी येथे सय्यद मोदी आंतरराष्टÑीय बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. त्याचवेळी युवा खेळाडू लक्ष्य सेनला पराभवाचा धक्का बसला.श्रीकांतने भारताच्याच पारुपली कश्यपला १८-२१, २२-२०, २१-१६ असे पराभूत केले. त्याचा सामना आता कोरियाच्या सोन वान हो याच्याशी होणार आहे. तींन गेमपर्यंत रंगलेल्या या चुरशीच्या सामन्यात कश्यपने दमदार सुरुवात करत श्रीकांतला दडपणाखाली ठेवले. त्याने पहिला गेम जिंकत सामन्यात वर्चस्वही राखले. मात्र श्रीकांतने यानंतर मोक्याच्या वेळी खेळ उंचावत सलग दोन गेम जिंकताना कश्यपचा पराभव केला. श्रीकांतचे निर्णायक स्मॅश आणि नेटजवळील चपळ खेळ यापुढे कश्यपचा निभाव लागला नाही. सौरभ वर्माने अलाप मिश्रा याला २१-११, २१-१८ असे पराभूत केले. त्याचा सामना थायलंडच्या कुनालवत वितिदसार्न याच्याशी होणार आहे.दुसरीकडे, थायलंडच्या कुनालवत वितिदसार्न याने बी. साई प्रणीतचा २१-११, २१-१७ असा अनपेक्षित पराभव करत उपांत्यपूर्व फेरी गाठली. पुढील सामन्यात तो भारताच्या सौरभ वर्माविरुद्ध खेळेल. भारताचा युवा खेळाडू लक्ष्य सेनला अनुभवी सोन वान याच्याकडून २१-१४, २१-१७ असे पराभूत व्हावे लागले. अजय जयरामयाला चीनच्या झाओ जुन पेंगे याने तीन गेममध्ये १८-२१, २१-१४, २८-३० असे नमविले. सिरिल वर्माचाही हियो कवांगकडून २१-९, २४-२२ असा पराभव झाला.महिला दुहेरीत अश्विनी पोनप्पा व एन.सिक्की रेड्डी यांनी इंग्लंडच्या चोले बिर्च-लॉरेन स्मिथ यांच्याविरुद्ध पहिल्या गेमनंतर माघार घेतली. पायाचे स्नायू दुखावल्याने अश्विनीला खेळण्यास अडचण आली. तसेच, सिमरन सिंघी-रितिका ठाकर यांनी रिया मुखर्जी-अनुरा प्रभुदेसाई यांचा २१-१२,२१-१५ असा पराभव केला.

टॅग्स :BadmintonBadminton