जपान ओपनमध्ये सर्वांची नजर सिंधूवर, विजेतेपद पटकावण्यास प्रयत्नशील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2017 03:44 IST2017-09-19T03:43:36+5:302017-09-19T03:44:40+5:30

रविवारी कोरिया ओपनमध्ये जेतेपदाचा मान मिळवणारी पी. व्ही. सिंधू आज मंगळवारपासून पात्रता फेरीने प्रारंभ होणा-या जपान ओपनमध्ये तिसरे सुपर सिरीज विजेतेपद पटकावण्यास प्रयत्नशील आहे. किदाम्बी श्रीकांत व सायना नेहवाल हे दिग्गज भारतीय बॅडमिंटनपटूही या स्पर्धेत सहभागी होत आहेत.

Seeking the title of Japan Open at Sindhu, everyone wins the title | जपान ओपनमध्ये सर्वांची नजर सिंधूवर, विजेतेपद पटकावण्यास प्रयत्नशील

जपान ओपनमध्ये सर्वांची नजर सिंधूवर, विजेतेपद पटकावण्यास प्रयत्नशील

टोकियो : रविवारी कोरिया ओपनमध्ये जेतेपदाचा मान मिळवणारी पी. व्ही. सिंधू आज मंगळवारपासून पात्रता फेरीने प्रारंभ होणा-या जपान ओपनमध्ये तिसरे सुपर सिरीज विजेतेपद पटकावण्यास प्रयत्नशील आहे. किदाम्बी श्रीकांत व सायना नेहवाल हे दिग्गज भारतीय बॅडमिंटनपटूही या स्पर्धेत सहभागी होत आहेत.
सिंधूने रविवारी कोरिया ओपनमध्ये मिनात्सु मितानीविरुद्ध दुसरा गेम गमाविल्यानंतरही विजेतेपद पटकावले. या आठवड्यात खेळल्या जाणाºया स्पर्धेत सिंधूची सुरुवातीच्या फेरीतच तिच्याविरुद्ध लढत होणार आहे.
हैदराबादच्या या २२ वर्षीय खेळाडूने रविवारी विश्व चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पत्कराव्या लागलेल्या पराभवाची परतफेड करताना कोरिया ओपनमध्ये जपानच्या नोजोमी ओकुहाराचा पराभव केला. सिंधूचे यंदाच्या मोसमातील हे दुसरे सुपर सिरीज विजेतेपद आहे. 

Web Title: Seeking the title of Japan Open at Sindhu, everyone wins the title