शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातच्या गांधीनगर येथील मतदान केंद्रात PM नरेंद्र मोदींनी बजावला मतदानाचा हक्क
2
बारामतीत अजित पवार गटावर पैसे वाटल्याचा आरोप; रोहित पवारांचा दावा, Video दाखवले
3
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात
4
संपादकीय: सगळ्याच जिभा घसरल्या !
5
सुनीता विल्यम्स यांची अवकाश भरारी स्थगित; टेक ऑफच्या आधी अंतराळयानात तांत्रिक बिघाड
6
कांदा निर्यातबंदीची मोठी किंमत मोजावी लागली; राज्यातील शेतकऱ्यांना एकरी तीन लाखांचा फटका
7
किम जोंगच्या ‘प्लेझर स्क्वॉड’साठी २५ तरुणी; तिची दोनदा निवड झाली, पण...
8
‘घर की बिटीया’ राजकीय आखाड्यात; अखिलेश यादवांची मुलगी प्रचाराच्या मैदानात... वेधतेय लक्ष...
9
निवडणूक आयोगाचा कणा थोडा ताठ राहील? एकाएकी मतदान वाढले, कुठे तरी पाणी मुरतेय...
10
आजचे राशीभविष्य - ७ मे २०२४; आर्थिक लाभाची शक्यता, विवाहेच्छुकांना योग्य जोडीदार मिळण्याची संभावना
11
भाजपचे २० ते २५ आमदार फोडण्याचे उद्धव ठाकरे यांचे कारस्थान होते; एकनाथ शिंदे यांचा गौप्यस्फोट
12
भारत-पाकिस्तान करायला ही काय क्रिकेटची मॅच आहे का? रमेश चेन्निथलांचा भाजपला सवाल
13
गुजराती सोसायटीत मराठी कार्यकर्त्यांना प्रचारास मज्जाव; 'आम्ही भाजपलाच मतदान करणार'
14
कितीही असाे तापमानाचा पारा; गाजवा तुमच्या मतदानाचा तोरा
15
याला म्हणतात घबाड! मंत्र्याच्या पीएचा नोकर, पगार फक्त १५ हजार; घरात ३० कोटींचा ढीग
16
काहीही करा, पण मतदानाची टक्केवारी वाढवा; अन्यथा कारवाईस तयार रहा, भाजपश्रेष्ठी धास्तावले
17
दहशतवाद्यांवर २० लाखांचे बक्षीस, दोन संशयित दहशतवाद्यांची रेखाचित्रे जारी; शेकडो जवानांकडून शोधमोहीम
18
ठाकरे गट व महायुती कार्यकर्त्यांत वाद; उज्वल निकमांचा प्रचार करतानाचा प्रसंग
19
साधनसंपत्ती तरीही लोक राहिले गरिब; ओडिशात पंतप्रधान माेदींचा हल्लाबाेल
20
कोणत्या भागातून किती लीड मिळते, त्यावर महापालिकेसाठी उमेदवार ठरविले जातील

सायनाला अजिंक्यपद, रोमहर्षक लढतीत सिंधूवर मात करत पटकावले विजेतेपद  

By ऑनलाइन लोकमत | Published: November 08, 2017 7:46 PM

राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या महिला एकेरीच्या अंतिम लढतीत सायना नेहवालने पी.व्ही. सिंधूवर मात करत विजेतेपद पटकावले.

नागपूर -   राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या महिला एकेरीच्या अंतिम लढतीत सायना नेहवालने पी.व्ही. सिंधूवर मात करत विजेतेपद पटकावले. अत्यंत चुरशीच्या झालेल्या अंतिम लढतीत सायनाने सिंधूवर 21-17, 27-25 अशी मात केली. सायनाचे या स्पर्धेतील हे तिसरे विजेतेपद आहे.  सायना नेहवाल  आणि पी.व्ही. सिंधू यांच्यातील अंतिम लढत रंगतदार झाली. दोन्ही खेळाडूंनी तोडीस तोड खेळ केल्याने पहिल्या गेममध्ये प्रत्येक पॉइंटसाठी चुरस दिसून आली. सायनाने सुरुवातीला घेतलेला आघाडी कमी करत सिंधूने गेममध्ये 17-18 अशी मजल मारली होती. पण सायनाने शेवटचे तीन पॉईंट जिंकत पहिला गेम 21-17 ने खिशात टाकला.पहिला गेम गमावल्यानंतर दुसऱ्या गेममध्ये सिंधूने आक्रमक खेळ करून सायनावर हुकूमत राखली. पण उत्तरार्धात सायनाने जोरदार मुसंडी मारत 18-19 अशी आघाडी घेतली. मात्र सिंधूने पुन्हा खेळ उंचावत लढतीत 22-22 अशी बरोबरी साधली. मात्र सायनाने आपला अनुभव पणाला लावत हा गेम 27-25 अशा फरकाने जिंकला आणि विजेतेपदावर कब्जा केला. तत्पूर्वी झालेल्या पुरुष एकेरीच्या अंतिम लढतीत जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानी असलेल्या किदम्बी श्रीकांतला धक्का देत युवा बॅडमिंटनपटू एच. एस. प्रणॉय याने विजेतेपद पटकावले. अंतिम लढतीत प्रणॉयने अटीतटीच्या लढतीत श्रीकांतवर 21-15, 16-21, 21-7 अशी मात केली. काल झालेल्या पहिल्या उपांत्य सामन्यात प्रणॉयने महाराष्ट्राचा खेळाडू शुभांकर डे याचा २१-१४, २१-१७ ने पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला होता. तर दुस-या उपांत्य सामन्यात अनुभवी श्रीकांतने उत्तराखंडच्या लक्ष्य सेन याची  झुंज मोडून काढत २१-१६, २१-१८ने बाजी मारली होती.   मंगळवारी महिला एकेरीच्या पहिल्या उपांत्य सामन्यात अनुभवी सायनाने गोव्याची अनुरा प्रभुदेसाई हिच्यावर २१-११, २१-१० ने ३० मिनिटात विजय साजरा केला होता. दुस-या उपांत्य सामन्यात पी. व्ही. सिंधूने तीन गेममध्ये जी. ऋत्विक शिवानीचे आव्हान ५० मिनिटांत १७-२१, २१-१५,२१-११ असे संपुष्टात आणले होते.  

टॅग्स :BadmintonBadmintonSportsक्रीडा