प्रणॉयने दिले सायना, सिंधू यांना श्रेय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2018 01:28 IST2018-02-19T01:27:45+5:302018-02-19T01:28:00+5:30

भारताचा स्टार शटलर एच. एस. प्रणॉय याने पी. व्ही. सिंधू आणि सायना नेहवाल यांना आपल्या यशाचे श्रेय दिले आहे

Saina, Sindhu give credit to Prannoy | प्रणॉयने दिले सायना, सिंधू यांना श्रेय

प्रणॉयने दिले सायना, सिंधू यांना श्रेय

मुंबई : भारताचा स्टार शटलर एच. एस. प्रणॉय याने पी. व्ही. सिंधू आणि सायना नेहवाल यांना आपल्या यशाचे श्रेय दिले आहे. तो म्हणाला, की कोणत्याही सामन्यात सकारात्मक मानसिकतेने खेळण्यासाठी मला भारताच्या या दोन दिग्गज महिला खेळाडूंचा फायदा होतो. गेल्या चार-पाच वर्षांत प्रत्येक खेळाडूमध्ये एक बदल झालेला दिसून येतो, तो म्हणजे जिंकण्याचा आत्मविश्वास. पहिल्यांदा कोणत्याही विदेशी खेळाडूचे नाव पाहिल्यावर वाटायचे की विजय कठीण आहे; पण आता परिस्थिती बदललेली आहे.
प्रणॉय २५ व्या जी. डी. बिर्ला स्मृती मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेच्या पुरस्कार वितरण समारंभात बोलत होता. या वेळी नंदू नाटेकर आणि मुख्य प्रशिक्षक पुलेला गोपीचंद उपस्थित होते. प्रणॉय पुढे म्हणाला की, ‘जेव्हा सायना आणि सिंधू यांनी मोठ्या स्पर्धा जिंकतानाच चिनी खेळाडूंना नमविण्यास सुरुवात केली, तेव्हा इतर खेळाडूंनाही अशा दिमाखदार पराक्रम करण्याचा विश्वास मिळाला.’

Web Title: Saina, Sindhu give credit to Prannoy