शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

समीर, सायना आणि कश्यप उपांत्यपूर्व फेरीत; सात्विक-अश्विनी यांची विजयी आगेकूच

By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2018 1:15 AM

समीर वर्मा, सायना नेहवाल आणि पारुपल्ली कश्यप या भारतीय स्टार शटलर्सनी गुरूवारी येथे सैय्यद मोदी आंतरराष्ट्रीय विश्व सुपर टूर ३०० बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.

लखनऊ : समीर वर्मा, सायना नेहवाल आणि पारुपल्ली कश्यप या भारतीय स्टार शटलर्सनी गुरूवारी येथे सैय्यद मोदी आंतरराष्ट्रीय विश्व सुपर टूर ३०० बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.तीन वेळीची विजेती आणि दुसरी मानांकित खेळाडू सायनाने भारताच्याच युवा अमोलिका सिंह सिसौदियला २१-१४, २१-९ ने पराभूत केले. दुसरीकडे, २०१२ आणि २०१५ चा विजेता कश्यप याने पहिला गेम गमावल्यानंतर पुनरागमन करताना इंडोनेशियाच्या फिरमान अब्दूल खोलिक याचे आव्हान ९-२१, २२-२०, २१-८ असे संपुष्टात आणले.तिसऱ्या मानांकित समीर याने चीनच्या झाओ जुनपेंग याला २२-२०, २१-१७ असे पराभूत केले. आता पुढील फेरीत त्याचा सामना चीनच्या झोऊ जेकीविरुद्ध होईल. सायनाला पुढील लढतीमध्ये भारताच्याच रितुपर्णा दासविरुद्ध खेळेल. दासने श्रृती मुंदडाला २१-११, २१-१५ असे नमवले. कश्यप आठव्या मानांकित सिटीकोम थामिसनविरुद्ध लढेल.चौथ्या मानांकित बी. साई प्रणितने इंडोनेशियाच्या शेसार हिरेन रुस्तावितोला २१-१२, २१-१० असे पराभूत केले. तो आता चीनच्या लु ग्वांझूसोबत भिडेल. ग्वांझूने शुभंकर डे याला २१-१२, २१-१५ ने पराभूत केले.सात्विक-अश्विनी यांची विजयी आगेकूचमहिला एकेरीच्या अन्य सामन्यात साई उत्तेजिका राव चुक्काने रेश्मा कार्तिकला २१-१२, २१-१५ ने पराभूत केले. तिचा सामना आता माजी आॅलिम्पिक विजेती ली झुरेईसोबत होईल. त्याचप्रमाणे, सात्विक साईराज रांकीरेड्डी आणि अश्विनी पोनाप्पा यांच्या जोडीने अंतिम आठमध्ये प्रवेश केला आहे. त्यांनी मिश्र दुहेरीत शिवम शर्मा आणि पुर्विशा एस राम ला १२-२१, २१-१४, २१-१५ असे नमवत आगेकूच केली.

टॅग्स :BadmintonBadminton