सायनाने अवधच्या आशा कायम राखल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2018 11:24 IST2018-01-05T01:08:28+5:302018-01-05T11:24:13+5:30

सायना नेहवालने निर्णायक सामन्यात वीवेन च्यांग हिला पराभवाचा धक्का देत मुंबई रॉकेट्सविरुद्ध अवध वॉरियर्सचे आव्हान कायम राखले.

 Saina retains the hope of Ovad | सायनाने अवधच्या आशा कायम राखल्या

सायनाने अवधच्या आशा कायम राखल्या

लखनऊ - सायना नेहवालने निर्णायक सामन्यात वीवेन च्यांग हिला पराभवाचा धक्का देत मुंबई रॉकेट्सविरुद्ध अवध वॉरियर्सचे आव्हान कायम राखले.
लखनऊ येथील बाबू बनारसी दास बॅडमिंटन स्टेडियममध्ये झालेल्या या सामन्यात सायनाला हा विजय मिळवण्यासाठी तीन गेमपर्यंत झुंजावे लागले. पहिला गेम च्यांग हिने जिंकत अवधच्या पराभवावर जवळजवळ शिक्का मारलाच होता. परंतु झुंजार सायनाने जबरदस्त पुनरागमन करताना ८-१५, १५-१०, १५-१३ अशी बाजी मारत अवध संघाचे आव्हान कायम राखले.
याआधी झालेल्या दोन्ही सामन्यात मुंबईकरांनी विजय मिळवत भक्कम आघाडी घेतली होती. सामन्यातील आव्हान कायम राखण्यासाठी अवध संघाला आपाल्या उर्वरीत दोन्ही सामन्यांत विजय अनिवार्य असेल.
याआधी मिश्र दुहेरी लढतीत अवधच्या क्रिस्टिना पेडरसन - तांग चुन मान यांना मुंबईच्या गॅब्रिएला स्टोएवा - ली योंग डाए यांच्याविरुद्ध १-२ असा पराभव पत्करावा लागला. यानंतर पुरुष एकेरीमध्ये मुंबईच्या समीर वर्माने सलग दोन गेममध्ये बाजी मारताना हार्षित अग्रवालचा १५-६, १५-१४ असा पराभव करत मुंबईला २-० असे आघाडीवर नेले होते.

Web Title:  Saina retains the hope of Ovad