सायना अंतिम फेरीत, श्रीकांत उपांत्य फेरीत पराभूत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2018 02:22 IST2018-10-21T02:22:43+5:302018-10-21T02:22:56+5:30

भारतीय बॅडमिंटनस्टार सायना नेहवालने शनिवारी इंडोनेशियाच्या ग्रेगोरिया टुनजुंगचा सहज पराभव करीत डेन्मार्क ओपन स्पर्धेत महिला एकेरीच्या अंतिम फेरीत प्रवेश केला

 Saina, in the final round, lost to Srikanth in the semifinals | सायना अंतिम फेरीत, श्रीकांत उपांत्य फेरीत पराभूत

सायना अंतिम फेरीत, श्रीकांत उपांत्य फेरीत पराभूत

ओडेन्से : भारतीय बॅडमिंटनस्टार सायना नेहवालने शनिवारी इंडोनेशियाच्या ग्रेगोरिया टुनजुंगचा सहज पराभव करीत डेन्मार्क ओपन स्पर्धेत महिला एकेरीच्या अंतिम फेरीत प्रवेश केला, पण किदाम्बी श्रीकांतला पुरुष एकेरीच्या उपांत्य फेरीत पराभव स्वीकारावा लागला.
आॅलिम्पिक कांस्यपदकविजेत्या सायनाने ग्रेगोरियाचा केवळ ३० मिनिटांमध्ये एकतर्फी लढतीत २१-११, २१-१२ ने पराभव केला. सायनाला रविवारी अंतिम लढतीत जागतिक क्रमवारीतील अव्वल स्थानावर असलेल्या चिनी तैपेईच्या ताई जु यिंगसोबत खेळावे लागेल. ताई जु यिंगचा सायनाविरुद्ध कारकिर्दीतील रेकॉर्ड १२-५ असा आहे. सायनाने यापूर्वी २०१३ मध्ये तिचा पराभव केला होता, पण त्यानंतर चिनी तैपेईची खेळाडू गेल्या १० लढतींमध्ये विजयी ठरली आहे.
क्रमवारीत १० व्या स्थानावर असलेल्या सायनाने यंदा ताई जूविरुद्ध सर्व चारही सामने गमावले आहेत. यापूर्वी त्यांच्यादरम्यान अखेरची लढत आॅगस्टमध्ये जकार्ता येथे आशियन गेम्सच्या सेमी फायनलमध्ये झाली होती.
याआधी, पुरुष एकेरीच्या उपांत्य फेरीत श्रीकांतला लौकिकाला साजेशी कामगिरी करता आली नाही. जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या जपानाच्या केंटो मोमोटाने श्रीकांतचा १६-२१, १२-२१ ने पराभव केला. (वृत्तसंस्था)

Web Title:  Saina, in the final round, lost to Srikanth in the semifinals