सायना उपांत्य फेरीत, श्रीकांत पराभूत

By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2019 05:57 AM2019-01-26T05:57:05+5:302019-01-26T05:57:19+5:30

‘फुलराणी’ सायना नेहवालने शुक्रवारी मोसमातील दुसऱ्या उपांत्य सामन्यात सहज धडक दिली तर किदाम्बी श्रीकांत व पी.व्ही सिंधू यांना मात्र इंडोनेशिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व सामन्यात पराभव स्वीकारावा लागला.

 Saina defeats Srikanth in semis | सायना उपांत्य फेरीत, श्रीकांत पराभूत

सायना उपांत्य फेरीत, श्रीकांत पराभूत

googlenewsNext

जकार्ता: ‘फुलराणी’ सायना नेहवालने शुक्रवारी मोसमातील दुसऱ्या उपांत्य सामन्यात सहज धडक दिली तर किदाम्बी श्रीकांत व पी.व्ही सिंधू यांना मात्र इंडोनेशिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व सामन्यात पराभव स्वीकारावा लागला.
मागच्या आठवड्यात मलेशिया मास्टर्सच्या उपांत्य फेरीत धडक देणारी आठवी मानांकित सायनाने येथे थायलंडची पोर्नपावी चोंचुवोंग हिच्यावर २१-७, २१-१८ ने मात करीत उपांत्य फेरी गाठली. राष्टÑकुल क्रीडा स्पर्धेची दोनदा विजेती राहिलेल्या सायनाला उपांत्य सामन्यात चीनच्या सहाव्या मानांकित बिगजियाओ विरुद्ध झुंज द्यावी लागेल. कारकिर्दीत प्रथमच सायना बिगजियाओविरुद्ध खेळणार आहे.
श्रीकांत हा मात्र उपांत्यपूर्व सामन्यात स्थानिक खेळाडू आणि आशियाई क्रीडा स्पर्धेचा चॅम्पियन जोनाथन ख्रिस्टी याच्याकडून १८-२१, १९-२१ अशा फरकाने पराभूत झाला. श्रीकांत यंदा सलग दुसºयांदा उपांत्यपूर्व लढतीत पराभूत झाला हे विशेष.
दरम्यान, सिंधूचा आॅलिम्पिक चॅम्पियन कॅरोलिन मारिनविरुद्ध निभाव लागला नाही. एकतर्फी लढतीत मारिनने सिंधूचा २१-११, २१-१२ ने पराभव केला. मारिनविरुद्ध सिंधूची ही १३ वी लढत होती. सिंधू सध्या ५-७ ने पिछाडीवर आहे. त्यात रिओ आॅलिम्पिक व २०१८ च्या विश्व चॅम्पियनशिपच्या अंतिम लढतींमध्ये पत्कराव्या लागलेल्या पराभवाचा समावेश आहे. (वृत्तसंस्था)

Web Title:  Saina defeats Srikanth in semis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.