सिंधूने केला चिनी कंपनीशी करार, थेट कोहलीशी केली बरोबरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2019 20:34 IST2019-02-08T20:31:53+5:302019-02-08T20:34:37+5:30

बॅडमिंटन विश्वातील हा सर्वात मोठा करार असल्याचे बोलले जात आहे.

pv Sindhu signed deal with Chinese company | सिंधूने केला चिनी कंपनीशी करार, थेट कोहलीशी केली बरोबरी

सिंधूने केला चिनी कंपनीशी करार, थेट कोहलीशी केली बरोबरी

नवी दिल्ली : ऑलिम्पिक आणि विश्व अजिंक्यपद स्पर्धेत रौप्यपदक पटकावणाऱ्या पी. व्ही. सिंधूने चीनच्या एका कंपनीशी करार केला आहे. ही कंपनी खेळाची सामग्री बनवणारी आहे. या कंपनिशी सिंधूचा चार वर्षांसाठी करार झाला आहे. या चार वर्षांसाठी सिंधूला 50 कोटी रुपये मिळणार आहेत. बॅडमिंटन विश्वातील हा सर्वात मोठा करार असल्याचे बोलले जात आहे. या कंपनीने गेल्या महिन्यात बॅडमिंटनपटू किदम्बी श्रीकांतबरोबर 35 कोटी रुपयांचा करार केला होता. 

कसा आहे करार...
सिंधूला या करारामधून 40 कोटी रुपयांची स्पॉन्सरशिप मिळणार आहे. त्याचबरोबर 10 कोटी रुपयांची सिंधूला खेळाची सामुग्री देण्यात येणार आहे.

कोहलीशी बरोबरी
प्युमा या कंपनीने भारताचा कर्णधार विराट कोहलीबरोबर आठ वर्षांचा करार केला आहे. या आठ वर्षांसाठी प्युमा कंपनीकडून कोहलीला 100 कोटी रुपये मिळाले होते. आता सिंधूला चार वर्षांसाठी 50 कोटी मिळाले असून तिने कोहलीबरोबर बरोबरी केली आहे.
 

Web Title: pv Sindhu signed deal with Chinese company

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.