परभणीत संत गजानन महाराज प्रकट दिन उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2020 23:55 IST2020-02-15T23:54:56+5:302020-02-15T23:55:38+5:30
जिल्हाभरातील संत गजानन महाराज मंदिरात शनिवारी ‘गण गण गणात बोते’चा जयजयकार करीत संत गजानन महाराज यांचा प्रकट दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

परभणीत संत गजानन महाराज प्रकट दिन उत्साहात
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : जिल्हाभरातील संत गजानन महाराज मंदिरात शनिवारी ‘गण गण गणात बोते’चा जयजयकार करीत संत गजानन महाराज यांचा प्रकट दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
शहरातील स्रेहशारदा नगरात प्रकट दिनानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले होते. शनिवारी दुपारी १२ वाजता श्री गजानन महाराज प्रकट दिन सोहळा साजरा करण्यात आला. तत्पूर्वी ह.भ.प. माऊली महाराज मुडेकर यांचे काल्याचे कीर्तन झाले. गुलालाची उधळण करीत आणि ‘गण गण गणात बोते’चा जयजयकार करीत प्रकट दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होत. महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता झाली.
त्याचप्रमाणे एकता कॉलनीतील गजानन महाराज मंदिर, शास्त्रीनगर, सिंचननगर या ठिकाणीही प्रकट दिनानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. येथील कौस्तुभ मंगल कार्यालयात प्रकट दिनानिमित्त १३ ते १५ फेब्रुवारी या काळात विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. आत्मोन्नती मंडळाच्या वतीने हा उत्सव साजरा करण्यात आला. संतकवी दासगणू महाराज लिखित श्री गजानन विजय ग्रंथाचे पारायण तसेच प्रवचनाचे कार्यक्रम पार पडले. या प्रसंगी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.