पनवेल ओपन बॅडमिंटनची चुरस २४ नोव्हेंबरपासून
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2018 02:26 IST2018-11-19T02:26:25+5:302018-11-19T02:26:46+5:30
महाराष्ट्र बॅडमिंटन संघटनेच्या (एमबीए) मान्यतेने आणि न्यू बॅडमिंटन असोसिएशन पनवेलच्या वतीने २४ आणि २५ नोव्हेंबर दरम्यान पनवेल ओपन राज्यस्तरीय बॅडमिंटन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

पनवेल ओपन बॅडमिंटनची चुरस २४ नोव्हेंबरपासून
नवी मुंबई : महाराष्ट्र बॅडमिंटन संघटनेच्या (एमबीए) मान्यतेने आणि न्यू बॅडमिंटन असोसिएशन पनवेलच्या वतीने २४ आणि २५ नोव्हेंबर दरम्यान पनवेल ओपन राज्यस्तरीय बॅडमिंटन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेसाठी ‘लोकमत’ माध्यम प्रायोजक आहे.
पनवेल जिमखाना भवन येथे होणाऱ्या या स्पर्धेत २४-२५ नोव्हेंबरला राज्यस्तरीय पुरुष दुहेरी तसेच एकेरी लढती रंगतील. या स्पर्धेत राज्यभरातील खेळाडूंनी मोठ्या संख्येने सहभाग निश्चित केला असून स्पर्धेची प्रवेश प्रक्रिया दोन दिवसांनी वाढविण्यात आल्याची माहिती, आयोजकांनी दिली.
तसेच १-२ डिसेंबरला पनवेल जिमखाना भवन येथेच महिलांच्या राज्यस्तरीय एकेरी व दुहेरी गटाच्या स्पर्धाही रंगणार असून या स्पर्धेसाठीही मोठा प्रतिसाद मिळत असल्याची माहिती आयोजकांनी दिली. दोन्ही स्पर्धांसाठी २० नोव्हेंबरपर्यंत इच्छुक खेळाडू आपला सहभाग नोंदवू शकतात. स्पर्धेविषयी अधिक माहिती मिळवण्यासाठी आयोजकांनी www.nbapanvel.com या संकेतस्थळावर भेट देण्याचे आवाहन केले आहे.