पी. व्ही. सिंधूची उपांत्य फेरीत धडक; ओकुहारावर मात
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2019 04:08 IST2019-07-20T04:08:02+5:302019-07-20T04:08:09+5:30
भारताची अव्वल बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूने शुक्रवारी येथे जपानच्या नोजोमी ओकुहाराचा थेट गेममध्ये पराभव करीत इंडोनेशिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेत महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला.

पी. व्ही. सिंधूची उपांत्य फेरीत धडक; ओकुहारावर मात
जकार्ता : भारताची अव्वल बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूने शुक्रवारी येथे जपानच्या नोजोमी ओकुहाराचा थेट गेममध्ये पराभव करीत इंडोनेशिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेत महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. आॅलिम्पिक रौप्यपदक विजेती व येथे पाचवे मानांकन प्राप्त सिंधूला जपानच्या तिसऱ्या मानांकित खेळाडूला २१-१४, २१-७ ने पराभूत करताना विशेष घाम गाळावा लागला नाही. ही लढत केवळ ४४ मिनिटांमध्ये संपली. सिंधू उपांत्य फेरीत चीनच्या दुसºया मानांकित चेन यु फेईच्या आव्हानाला सामोरे जाईल.
सिंधूने सलग चार गुण वसूल करीत १०-६ अशी आघाडी घेतली. त्यानंतर ओकुहाराने दोन गुण मिळवले, पण ब्रेकपर्यंत भारतीय खेळाडूने ११-८ ने आघाडी घेतली होती. त्यानंतर सिंधूने सामन्यावर मजबूत पकड मिळवली आणि ओकुहाराला कुठली संधी दिली नाही. दुसरा गेम एकतर्फी ठरला. या लढतीत सिंधूला तिच्याहून वरचे मानांकन असलेल्या खेळाडूकडून कोणतेही आव्हान मिळाले नाही.
पी. व्ही. सिंधूने सुरुवातीपासून या लढतीवर वर्चस्व गाजवले. एकवेळ दोन्ही खेळाडूंमध्ये ६-६ अशी बरोबरी होती, पण त्यानंतर मात्र भारतीय खेळाडूने वर्चस्व गाजवले.