पी. व्ही सिंधूची उपांत्य फेरीत धडक

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2018 19:08 IST2018-12-14T19:07:31+5:302018-12-14T19:08:46+5:30

या स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत सिंधूने अमेरिकेच्या झँग बीवन हिच्यावर दोन सेट्समध्ये मात केली.

P. V Sindhu enters in semi final | पी. व्ही सिंधूची उपांत्य फेरीत धडक

पी. व्ही सिंधूची उपांत्य फेरीत धडक

नवी दिल्ली : भारताची अव्वल बॅडमिंटनपटू पी. व्ही सिंधूने गुआंगझू येथे सुरु असलेल्या बीडब्ल्यू वर्ल्ड टूर्स फायनल्स या स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारली आहे. या स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत सिंधूने अमेरिकेच्या झँग बीवन हिच्यावर दोन सेट्समध्ये मात केली.



 

उपांत्यपूर्व फेरीत सिंधूने झँग बीवन हिला २१-९, २१-१५ असे दोन सेट्समध्ये सहज पराभूत केले. पहिला गेम सिंधूने सहजपणे आपल्या नावावर केला. पहिल्या गेममध्ये सिंधू अधिक आक्रमक खेळत होती. दुसरीकडे झँगला पहिल्या गेममध्ये चांगला खेळ करता आला नाही. पण दुसऱ्या गेममध्ये मात्र झँगने सिंधूला चांगली लढत दिली. पण सिंधूने दुसऱ्या गेममध्ये अनुभव पणाला लावला.
 

Web Title: P. V Sindhu enters in semi final

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.