मलेशियन बॅडमिंटन : सायनाचे आव्हान संपुष्टात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2019 03:39 IST2019-01-20T03:39:50+5:302019-01-20T03:39:57+5:30

स्टार खेळाडू सायना नेहवाल हिचे मलेशियन मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेतील आव्हान शनिवारी संपुष्टात आले.

 Malaysian Badminton: Ending the Challenge of Saina | मलेशियन बॅडमिंटन : सायनाचे आव्हान संपुष्टात

मलेशियन बॅडमिंटन : सायनाचे आव्हान संपुष्टात

क्वालालम्पूर : स्टार खेळाडू सायना नेहवाल हिचे मलेशियन मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेतील आव्हान शनिवारी संपुष्टात आले. महिला एकेरीच्या उपांत्य सामन्यात आॅलिम्पिक आणि विश्व चॅम्पियन स्पेनची कॅरोलिना मारिन हिने सायनाचा पराभव केला.
२०१७ मध्ये या स्पर्धेची विजेती राहिलेल्या २८ वर्षांच्या सायनाला ४० मिनिटांच्या खेळात चौथी मानांकित मारिनने १६-२१, १३-२१ ने पराभूत केले. सायनाने सुरुवात चांगली केली. त्यात ५-२ अशी आघाडीदेखील मिळाली होती.
मारिननेदेखील आक्रमक खेळ करून सलग सात गुणांसह ११-९ अशी आघाडी संपादन केली. सायनाने यानंतर १४-१४ अशी बरोबरी साधली. पण मारिनने भारतीय खेळाडूला एकही संधी न देता २० मिनिटांत पहिला गेम जिंकला.
सायनाने मुसंडी मारण्याचा प्रयत्न करून पाहिला; पण तिला कुठलीही संधी मिळविता आली नाही. मारिनला अखेरच्या टप्प्यात आठवेळा मॅच पॉर्इंट मिळाले.(वृत्तसंस्था)

Web Title:  Malaysian Badminton: Ending the Challenge of Saina