शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

लक्ष्यचा स्कॉटिश ओपनमध्ये दबदबा, यंदाच्या मोसमातील चौथे अजिंक्यपद पटकावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2019 04:58 IST

भारतीय बॅडमिंटनमधील उदयोन्मुख स्टार लक्ष्य सेनने येथे स्कॉटिश ओपन पुरुष एकेरीच्या अंतिम फेरीमध्ये ब्राझीलच्या यगोर कोएल्होविरुद्ध रोमांचक विजय मिळवत तीन महिन्यांत चौथे जेतेपद पटकावले.

ग्लास्गो : भारतीय बॅडमिंटनमधील उदयोन्मुख स्टार लक्ष्य सेनने येथे स्कॉटिश ओपन पुरुष एकेरीच्या अंतिम फेरीमध्ये ब्राझीलच्या यगोर कोएल्होविरुद्ध रोमांचक विजय मिळवत तीन महिन्यांत चौथे जेतेपद पटकावले. अव्वल मानांकित लक्ष्यने रविवारी रात्री झालेल्या अंतिम लढतीत ब्राझीलच्या प्रतिस्पर्ध्यांविरुद्ध ५६ मिनिटांमध्ये १८-२१, २१-१८, २१-१९ ने विजय मिळवला.उत्तराखंडच्या १८ वर्षीय लक्ष्यचे गेल्या चार स्पर्धांमधील हे तिसरे विजेतेपद आहे. त्याने यापूर्वी सारलोरलक्स ओपन, डच ओपन आणि बेल्जियम इंटरनॅशनलमध्ये जेतेपदाचा मान मिळवला होता. आयरिश ओपनमध्ये दुसऱ्या फेरीत पराभव स्वीकारावा लागल्यानंतर लक्ष्यने येथे शानदार पुनरागमन केले. भारतीय खेळाडूने आपल्या मोहिमेची सुरुवात आॅस्ट्रियाच्या लुका व्रेबरविरुद्ध सरळ गेम्समध्ये विजय मिळवत केली. त्यानंतर मायदेशातील सहकारी किरण जॉर्जचा पराभव करीत उपांत्यपूर्व फेरी गाठली.जागतिक क्रमवारीत ४१ व्या क्रमांकावर असलेल्या लक्ष्यने सहाव्या मानांकित ब्रायन यंगचा थेट दोन गेममध्ये पराभव केला आणि त्यानंतर उपांत्य फेरीत फ्रान्सच्या क्रिस्टो पोपोवविरुद्ध सरशी साधली. या विजेतेपदासह लक्ष्य बीडब्ल्यूएफ मानांकनामध्ये अव्वल ४० मध्ये स्थान निश्चित करणार असून ग्रेड दोनच्या अव्वल स्पर्धांमध्ये थेट प्रवेशासाठी पात्रता मिळवण्याच्या समीपराहील. (वृत्तसंस्था)1लक्ष्यपूर्वी आनंद पवार (२०१० व २०१२), अरविंद भट (२००४) आणि पुलेल्ला गोपीचंद (१९९९) यांनी स्कॉटिश ओपनमध्ये जेतेपद पटकावले आहे. लक्ष्यने लढतीत संथ सुरुवात केली, पण त्यानंतर १०-८ अशी आघाडी मिळवण्यात यशस्वी ठरला.2कोएल्होने सलग सहा गुण वसूल करीत १४-१० अशी आघाडी घेतली आणि त्यानंतर त्याने पहिला गेम जिंकला. लक्ष्यने दुसºया गेममध्ये शानदार पुनरागमन करताना ७-० अशी आघाडी घेतली, पण ब्राझीलच्या खेळाडूने १७-१७ अशी बरोबरी साधली. भारतीय खेळाडूने पुढील पाचपैकी चार गुण वसूल करीत सामन्यात १-१ अशी बरोबरी साधली.3तिसºया व निर्णायक गेममध्ये चुरशीची लढत झाली. ब्रेकदरम्यान कोएल्हो ११-८ ने आघाडीवर होता, पण लक्ष्यने बरोबरी साधल्यानंतर गेम व सामना जिंकत जेतेपदावर शिक्कामोर्तब केले.

टॅग्स :BadmintonBadminton