ओडेन्स : भारताचा स्टार बॅडमिंटनपटू किदाम्बी श्रीकांतने हाँगकाँगच्या व्होंग विंग की व्हिन्सेटचा २१-१८, २१-१७ ने पराभव करीत डेन्मार्क ओपन सुपर सिरीज बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष एकेरीच्या अंतिम फेरीत धडक मारली.उपांत्य फेरीत जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या व्हिक्टर अॅक्सेलसेनला पराभवाचा धक्का देणा-या श्रीकांतने शनिवारी उपांत्य लढतीतही कामगिरीत सातत्य राखले.पहिल्या गेममध्ये वर्चस्व गाजवल्यानंतर श्रीकांतने दुस-या गेममध्येही लय कायम राखत विजय साकारला. २०१७ च्या मोसमात श्रीकांतने प्रतिष्ठेच्या स्पर्धेत चौथ्यांदा अंतिम फेरी गाठली आहे.
किदाम्बी श्रीकांतची हाँगकाँगच्या व्होंग विंग की व्हिन्सेटवर मात करत अंतिम फेरीत धडक
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2017 07:22 IST