के. श्रीकांतला पराभवाचा धक्का, हैदराबादच्या बी. साई प्रणितचा विजय

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2018 22:29 IST2018-01-07T22:26:27+5:302018-01-07T22:29:44+5:30

हैदराबाद हंटर्सच्या बी. साई प्रणित याने अवध वॉरियर्सच्या किदाम्बी श्रीकांत याच्यावर १०-१५, १०-१५ असा विजय मिळवत अवध संघाला मोठा धक्का दिला

K. The shock of the Sri Lankans beat Hyderabad. Sai Pranit's victory | के. श्रीकांतला पराभवाचा धक्का, हैदराबादच्या बी. साई प्रणितचा विजय

के. श्रीकांतला पराभवाचा धक्का, हैदराबादच्या बी. साई प्रणितचा विजय

- आकाश नेवे
चेन्नई- हैदराबाद हंटर्सच्या बी. साई प्रणित याने अवध वॉरीयर्सच्या किदाम्बी श्रीकांत याच्यावर १५-१०,१५-१० असा विजय मिळवत अवध संघाला मोठा धक्का दिला. तर अवध वॉरीयर्सचा खेळाडू पारुपल्ली कश्यप याला हैदराबाद हंटर्सच्या ली हुएन सेऊंग याने पराभूत केले. येथील जवाहरलाल नेहरु इनडोअर स्टेडिअममध्ये सुरू असलेल्या प्रीमियर बॅडमिंटन लीग सामन्यात पारुपल्ली कश्यप याला हुएन सेऊंग याने १३-१५,९-१५, १४-१५ असे पराभूत केले. पहिल्या गेममध्ये आक्रमकपणे खेळ करणाऱ्या कश्यपने ली हुएन सेऊंग याला जेरीस आणले.

मात्र दुसऱ्या गेमनंतर ली याने जोरदार पुनरागमन केले. त्याने दुसरा गेम १५-९ असा जिंकला. त्यानंतर तिसऱ्या गेममध्ये कश्यप पिछाडीवर होता. ११-६ अशा पिछाडीवरून कश्यपने जोरदार पुनरागमन केले. मात्र ली याने अखेरच्या क्षणी गुणांची कमाई करत विजय मिळवला.

पुरूष दुहेरीच्या सामन्यात अवध संघाच्या चीन चुंग आणि तांग मान यांनी हैदराबादच्या मार्किस कुडो आणि युव युओन सेंग यांच्यावर १४-१५, १५-६, १५-११ असा विजय मिळवला. दोन्ही संघाच्या खेळाडूंमध्ये काही चांगल्या रॅली रंगल्या. सुरूवातीच्या दोन्ही सामन्यातील पराभवानंतर अवध वॉरीयर्सने आघाडी घेतली आहे.

Web Title: K. The shock of the Sri Lankans beat Hyderabad. Sai Pranit's victory