जयराम, रितुपर्णा उपांत्यपूर्व फेरीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2018 03:35 IST2018-08-10T03:35:37+5:302018-08-10T03:35:43+5:30

भारतीय खेळाडू अजय जयराम, रितुपर्णा दास आणि मिथुन मंजुनाथ यांनी येथे सुरू असलेल्या ७५ हजार डॉलर रोख बक्षिसांच्या व्हिएतनाम ओपन टूर सुपर १०० बॅडमिंटन स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठली.

Jayaram, Rituparna quarter-finals | जयराम, रितुपर्णा उपांत्यपूर्व फेरीत

जयराम, रितुपर्णा उपांत्यपूर्व फेरीत

हो ची मिन्ह सिटी : भारतीय खेळाडू अजय जयराम, रितुपर्णा दास आणि मिथुन मंजुनाथ यांनी येथे सुरू असलेल्या ७५ हजार डॉलर रोख बक्षिसांच्या व्हिएतनाम ओपन टूर सुपर १०० बॅडमिंटन स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठली.
कारकिर्दीत सर्वोत्तम १३ व्या स्थानावर पोहोचलेल्या जयरामने ब्राझीलचा इगोर काल्हो याचा ३४ मिनिटांत २२-२०, २१-१४ अशा फरकाने पराभव केला. त्याची पुढील फेरीत कॅनडाचा झियाडोंग शेंग याच्याविरुद्ध गाठ पडणार आहे. माजी राष्ट्रीय चॅम्पियन रितुपर्णाने चायनीज तायपेईची सहावी मानांकित सुंग शुओ यून हिच्यावर २१-८,२१-१४ ने विजय नोंदविला. रितुपर्णाला पुढील लढतीत थायलंडची पिटायापोर्न चायवान हिच्याविरुद्ध खेळायचे आहे.
मागच्या महिन्यात रशियन ओपनची अंतिम फेरी गाठणारा मिथुन मंजुनाथ याने थायलंडचा अब्दुलराक नामकुल याचे कडवे आव्हान मोडित काढून ५६ मिनिटांत १८-२१, २१-१३, २१-१९ ने विजय नोंदविला. त्याची गाठ आता चीनचा झोऊ जेकीविरुद्ध पडेल.
अन्य लढतीत कार्तिक जिंदल याला मात्र पराभवाचे तोंड पहावे लागले. त्याला कॅनडाचा झियाडोंग शेंग याने २१-१०,२४-२२ अशा गुणफरकाने नमविले.

Web Title: Jayaram, Rituparna quarter-finals