एच. एस. प्रणॉयचा धमाकेदार विजय, अहमदाबाद स्मॅश मास्टर्सची आघाडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2018 21:29 IST2018-01-09T20:56:26+5:302018-01-09T21:29:11+5:30

अहमदबाद स्मॅश मास्टर्सचा एच. एस. प्रणॉय याने मुंबई रॉकेट्सच्या सान वोन हो याच्यावर १५-१२, १५-१२ असा विजय मिळवला. त्यासोबतच अहमदाबादने दोन गुणांची आघाडी घेतली आहे.

H. S. Prannoy's belligerent win, Ahmedabad Smash Masters lead | एच. एस. प्रणॉयचा धमाकेदार विजय, अहमदाबाद स्मॅश मास्टर्सची आघाडी

एच. एस. प्रणॉयचा धमाकेदार विजय, अहमदाबाद स्मॅश मास्टर्सची आघाडी

- आकाश नेवे
चेन्नई- अहमदबाद स्मॅश मास्टर्सचा एच. एस. प्रणॉय याने मुंबई रॉकेट्सच्या सान वोन हो याच्यावर १५-१२, १५-१२ असा विजय मिळवला. त्यासोबतच अहमदाबादने दोन गुणांची आघाडी घेतली आहे.

येथील जवाहरलाल नेहरु इनडोअर स्टेडिअममध्ये झालेल्या लढतीत पहिला गेम प्रणॉय याने सहज जिंकला. या गेममध्ये त्याने आपले कौशल्य दाखवत १५-१२ असा विजय मिळवला. मात्र दुसरा गेम त्याच्यासाठी कठीण ठरला. सान वोन हो याने ११-८ अशी आघाडी घेतली होती. मात्र प्रणॉय याने सलग चार गुण घेत १२-११ अशी आघाडी घेतली. प्रणॉयच्या काही दमदार स्मॅश पुढे सान वोनचे चालले नाही. अखेरीस दुसऱ्या गेममध्ये प्रणॉयने विजय मिळवला. प्रणॉय आणि सान वोनमधअये रॅली चांगल्या रंगल्या. मात्र विश्व रँकिंगमध्ये दहाव्या
स्थानावर असलेल्या प्रणॉय याने रँकिंगमध्ये पाचव्या स्थानावर असलेल्या सान वोला पराभूत केले.

मिश्र दुहेरीच्या पहिल्या सामन्यात अहमदाबाद स्मॅश मास्टर्सच्या कॅमिला रिटर जुल आणि लॉ चेऊक हीम यांनी मुंबई रॉकेट्सच्या गॅर्‌बिएला स्टोइवा आणि ली योंग डाई यांना १५-११, १५-७ असे पराभूत केले. या लढतीवर कॅमिला आणि लॉ चेऊक यांनी वर्चस्व राखले. पहिल्या गेममध्ये स्टोइवा आणि ली योंग यांनी काहीसा प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. मात्र दुसऱ्या गेममध्ये त्यांचे नियंत्रणच राहिले नाही. त्यांच्यातील असमन्वयाचा फटका त्यांना बसला.

Web Title: H. S. Prannoy's belligerent win, Ahmedabad Smash Masters lead

टॅग्स :BadmintonBadminton